शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

सांगलीत रमजानच्या नमाजनंतर वक्फ विधेयकाविरोधात आंदोलन, पाचजणांवर गुन्हे दाखल 

By संतोष भिसे | Updated: April 1, 2025 16:59 IST

सांगली : वक्फ संशोधन विधेयकाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या पाचजणांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शौकात इनामदार (रा. जयहिंदनगर, मिरज), मोहम्मद ...

सांगली : वक्फ संशोधन विधेयकाविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या पाचजणांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शौकात इनामदार (रा. जयहिंदनगर, मिरज), मोहम्मद सिद्दिक बागवान (मूळ रा. कुरुंदवाड, सध्या रा. नुराणी मस्जिदीजवळ, मिरज), शमशुद्दीन इलायत तुल्ला शेख, रा. गुरुवार पेठ, मिरज), निहाल मतवाल (मूळ रा. कुरुंदवाड, सध्या रा. सरदार जमादार, मिरज यांच्याकडे) आणि जावेद मकसुद शेख (रा. रामनगर, सांगली), अशी त्यांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात पोलिस कर्मचारी सद्दामहुसेन मन्सूर मुजावर (रा. कुपवाड) यांनी फिर्याद दिली. सांगलीत जुना बुधगाव रस्त्यावर ईदगाह मैदानावर सोमवारी (दि. ३१) सकाळी रमजान ईदचे सामुदायिक नमाज पठण होते. पठण झाल्यावर या पाचजणांनी मैदानाबाहेर दोशी ऑटोमोबाईल दुकानासमोर उभे राहून आंदोलन केले. वक्फ संशोधन विधेयकाविरोधात घोषणाबाजी केली. घोषणांची पत्रके झळकवली. पोलिसांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या जिल्हाभरात बंदी आदेश लागू केला आहे. कोणत्याही आंदोलनास मनाई आहे. पोलिसांनी आंदोलनास परवानगी दिलेली नव्हती. तरीही पाचजणांनी आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा भंग केला. पोलिसांनी पाचही जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २२३, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ नुसार गुन्हे दाखल केले.

टॅग्स :Sangliसांगलीwaqf board amendment billवक्फ बोर्डagitationआंदोलनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस