प्रवीण दरेकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पलूसमध्ये निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:16+5:302021-09-22T04:29:16+5:30
पलूस : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे पलूस येथे ...

प्रवीण दरेकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा पलूसमध्ये निषेध
पलूस : विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे पलूस येथे जाहीर निषेध करण्यात आला.
अध्यक्षा पूजा लाड म्हणाल्या, भाजपचे नेते वारंवार महिलांबद्दल असंस्कारशील वक्तव्य करतात, ही भाजपची संस्कृती आहे का? भाजपच्या नेत्या चित्रा वाघ नेहमी महिलांना न्याय देण्याची भाषा करतात मग आता त्या कुठे गायब आहेत? या आधी राम कदम यांनीही असे महिलांबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. प्रवीण दरेकर यांनी महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी युवती काँग्रेस तीव्र आंदोलन करतील व दरेकर यांना महाराष्ट्रात फिरून देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी पलुस तालुका महिला अध्यक्ष नंदा पाटील, पलुस तालुका युवती अध्यक्ष प्राजक्ता जाधव, महिला जिल्हा संघटक पूनम जाधव, युवती जिल्हा सचिव स्मिता यादव, सुवर्णा पाटील, पुष्पा पाटील आदी उपस्थित होत्या.
210921\141-img-20210921-wa0022.jpg
प्रवीण दरेकर निषेध