शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नऊ टोळ्यांवर तडीपारीचे प्रस्ताव तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 16:37 IST

सांगली जिल्ह्यात ९ टोळ्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार असून, त्यातील काही टोळ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील नऊ टोळ्यांवर तडीपारीचे प्रस्ताव तयारपोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांची माहिती

सांगली : सध्या सुरू असलेला गणेशोत्सव आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तयारी केली आहे. त्यानुसार १ हजार ६३३ गुन्हेगारांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यात ९ टोळ्यांच्या तडीपारीचे प्रस्ताव तयार असून, त्यातील काही टोळ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.पोलीस अधीक्षक शर्मा म्हणाले की, सध्या सुरू असलेला गणेशोत्सव, मोहरम आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाच्यावतीने सर्व ती तयारी करण्यात आलेली आहे. उत्सव कालावधित अनूचित प्रकार घडू नये यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हेगारांवरील वचक वाढविण्यासाठी मोक्का व तडीपारीसारखी कारवाई केली जाणार आहे. पुरामुळे खर्चाला फाटा देत साधेपणाने मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. जिल्ह्यात ५ हजार १६३ मंडळांच्या गणपतीची प्रतिष्ठापना झाली आहे.सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रात सध्या ९० ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. वाहतुकीस शिस्त लागण्याबरोबरच यामुळे चोऱ्यांचेही प्रमाण कमी झाले आहे. महापालिकेकडून अजून ५० लाखांचा निधी मंजूर झाला असून, त्यातून अत्याधुनिक सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. येत्या दीड महिन्यात ही यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSangliसांगली