संख : बेवणूर (ता. जत) येथील सुबराव नारायण शिंदे यांची मंत्रालयातील आदिवासी विभागाच्या सहसचिव पदावर पदोन्नती झाली आहे. १९९६मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून त्यांची कक्ष अधिकारी म्हणून निवड झाली होती.
त्यांनी १९९७ ते २००७ याकाळात कक्ष अधिकारी ग्रामविकास विभाग, २००७ ते २०१३मध्ये नियोजन आयोग विभागात अवर सचिव, २०१४ ते २०२१मध्ये आदिवासी विभागात उपसचिव म्हणून काम केले.
त्यांना उपसचिव पदावरुन सहसचिव पदावर बढती मिळाली आहे. शिंदे यांनी कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातून बी. एस्सी. ॲग्री पदवी, तर एम. एस्सी. ॲग्री पदवी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून प्राप्त केली.
शिवबाराजे फाऊंडेशनचे संस्थापक तुकाराम रामहरी नाईक, विलास नारायण शिंदे, मधुकर महादेव शिंदे, दादासाहेब वाघमोडे, अरुण काळेल, तानाजी सरगर यांनी सुबराव शिंदे यांचे अभिनंदन केले.
फोटो : सुबराव नारायण शिंदे