मिरजेत पंधराजणांना प्रवेशबंदी

By Admin | Updated: September 7, 2014 00:19 IST2014-09-07T00:18:44+5:302014-09-07T00:19:08+5:30

प्रांताधिकाऱ्यांचे आदेश : गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई

Prohibition of Pandharaj in Miraj | मिरजेत पंधराजणांना प्रवेशबंदी

मिरजेत पंधराजणांना प्रवेशबंदी

मिरज : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील १५ जणांना शहरात पाच दिवस प्रवेशबंदीचा आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिला आहे. विविध गुन्हे दाखल असलेल्या आरोपींनी गणेशोत्सवादरम्यान शांतता भंग होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला होता.
शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल असणाऱ्या सूरज ओमासे, प्रणव घेवारे, सचिन दरवंदर, प्रसाद दरवंदर, किरण रजपूत, रावल कांबळे, महादेव कोरे, महादेव गोरे, विष्णू माने, अविनाश कोळेकर, महेश बसर्गी, इम्तियाज हंगड, वसिम बागवान, अविनाश पाटील, चद्रकांत पाटील (सर्व रा. मिरज) यांना गणेशोत्सवात दि. ५ ते १० पर्यंत प्रवेशबंदीचा आदेश बजावण्यात आला आहे.
प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी यादीवरील व सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीचा प्रस्ताव पोलिसांकडून सादर करण्यात येत आहे. त्याची चौकशी करुन हा प्रस्ताव प्रशासनाकडून मंजूर करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Prohibition of Pandharaj in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.