महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर

By Admin | Updated: January 26, 2016 01:02 IST2016-01-26T00:56:20+5:302016-01-26T01:02:04+5:30

६ फेब्रुवारीस निवड : २ फेब्रुवारीपासून होणार प्रक्रियेला सुरुवात

The program announced for Mayor selection | महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर

महापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर

सांगली : महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबत विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार सोमवारी महापालिका प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केला. २ फेब्रुवारीपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार असून, नव्या महापौर व उपमहापौराची निवड ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली होती. विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांनी याबाबत महापालिकेला पत्र पाठवून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याबाबत सूचना केली होती. त्यानुसार प्रशासनाने हा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांची नियुक्ती केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The program announced for Mayor selection