शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी टापूत साकारतेय रसायनविरहित साखर निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 01:00 IST

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर तालुक्यातील आळसंद-खंबाळे (भा.) येथे विराज केन्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो या नावाने रसायनविरहित साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पासाठी संपूर्ण अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, अमेरिकेतील पाच कंपन्यांशी साखर विक्रीचा करार करण्यात आला असल्याचे संस्थापक, माजी आमदार ...

दिलीप मोहिते ।लोकमत न्यूज नेटवर्कविटा : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर तालुक्यातील आळसंद-खंबाळे (भा.) येथे विराज केन्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रो या नावाने रसायनविरहित साखर निर्मितीचा देशातील पहिला प्रकल्प आकार घेऊ लागला आहे. प्रकल्पासाठी संपूर्ण अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, अमेरिकेतील पाच कंपन्यांशी साखर विक्रीचा करार करण्यात आला असल्याचे संस्थापक, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी सांगितले.साखरेपासून उपपदार्थांची निर्मिती सर्वच कारखाने करतात. परंतु, या पारंपरिक साखर कारखानदारीला छेद देत अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करीत विराज केन्सने रसायनविरहित साखर निर्मितीचा ‘जॅग्री शुगर’ उत्पादनाचा देशातील पहिला प्रकल्प आळसंद-खंबाळे येथील सुमारे १९ एकर माळरानावर उभा करण्यास सुरुवात केली आहे. तो आता अंतिम टप्प्यात आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ७५ कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. उत्पादित रसायनविरहित साखर परदेशात निर्यात होणार असून, अमेरिकेतील पाच कंपन्यांशी साखर विक्रीचा करार केला आहे. प्रतिदिन १२५० टन ऊस गाळप क्षमता असलेला हा प्रकल्प शंभर टक्के स्वयंचलित आहे.सध्या जागतिक बाजारपेठेत रसायनविरहित साखर, गूळ, गुळाची पावडर, खांडसरी साखर या पदार्थांना सर्वाधिक मागणी असल्याने या पदार्थांच्या निर्मितीलाच विराज केन्स प्राधान्य देणार आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली