शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: खासगी सावकाराची पिता-पुत्रास मारहाण, दहा लाखांसाठी साडेबारा लाखांची वसुली 

By हणमंत पाटील | Updated: November 25, 2023 13:42 IST

जिवे मारून घर पेटवण्याची धमकी

आष्टा : फारणेवाडी (ता. वाळवा) येथील शेतकरी संतोष तानाजी पाटील (वय २८) व त्यांच्या वडिलांना ढवळी (ता. वाळवा) येथील खासगी सावकार सचिन विठ्ठल पाटील याने मारहाण, शिवीगाळ करीत घर पेटवून देण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. दहा लाखांसाठी बारा लाख चाळीस हजाराची वसुली करूनही सचिन पाटील त्रास देत असल्याने संतोष पाटील यांनी आष्टा पोलिसात तक्रार दिली आहे.याबाबत आष्टा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फारणेवाडी येथील शेतकरी संतोष पाटील यांनी ढवळी येथील खासगी सावकार सचिन पाटील याच्याकडून ३ फेब्रुवारी २०२० ते २५ एप्रिल २०२० पर्यंत ८ लाख रुपये महिना १० टक्के व्याजाने घेतले. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी व्याजासह १२ लाख रुपये सचिन पाटील यास परत केले. त्यानंतर पुन्हा संतोष पाटील याने १० डिसेंबर २०२० रोजी १० टक्के व्याजाने १० लाख रुपये सचिन पाटील याच्याकडून घेतले. व्याज म्हणून १ लाख रुपये सचिन पाटील याने लगेच घेतले. उर्वरित ९ लाखापाेटी ८ जानेवारी २०२१ ते ६ एप्रिल २०२१ या दरम्यान वेळोवेळी संताेष यांनी व्याजासह १२ लाख ४० हजार रुपये परत केले. घेतलेल्या रकमेपेक्षा जादा पैसे परत करूनही आणखी रकमेची मागणी करत सचिन पाटील याने संतोष पाटील व त्याच्या वडिलांना मारहाण करीत, शिवीगाळ केली घर पेटवून देण्याची व जिवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस