सांगलीत कॉफी हाऊसवर छापा - अश्लील चाळे करणाऱ्या दहा प्रेमीयुगुलांना ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 23:39 IST2018-10-25T23:28:48+5:302018-10-25T23:39:22+5:30
विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयाजवळील एम. एस. कॉफी हाऊस अॅण्ड फास्ट फूडमधील दुसऱ्या मजल्यावर अश्लील चाळे करणाऱ्या प्रेमीयुगुलांचा सुरु असलेला अड्डा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकून उद्ध्वस्त केला

सांगलीत कॉफी हाऊसवर छापा - अश्लील चाळे करणाऱ्या दहा प्रेमीयुगुलांना ताब्यात
सांगली : विश्रामबाग येथील खरे मंगल कार्यालयाजवळील एम. एस. कॉफी हाऊस अॅण्ड फास्ट फूडमधील दुसऱ्या मजल्यावर अश्लील चाळे करणाºया प्रेमीयुगुलांचा सुरु असलेला अड्डा अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या छाप्यात अश्लील चाळे करणाऱ्या दहा प्रेमीयुगुलांना ताब्यात घेण्यात आले. कॉफी हाऊसचा मालक व व्यवस्थापकाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉफी हाऊसच्या नावाखाली अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकाने गेल्या दोन दिवसांपासून या कॉफी हाऊसवर वॉच ठेवला होता. तेथे बोगस ग्राहक पाठविले असता, हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावर अश्लील चाळे करण्यास बसण्यासाठी जागा दिली होती. यासाठी ताशी शंभर रुपये शुल्क घेतले जात होते. पथकाने गुरुवारी येथे छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच अश्लील चाळे करीत बसलेल्या प्रेमीयुगुलांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडले. दहा प्रेमीयुगुले सापडली. ती सर्व शहर परिसरातील आहेत.
सहायक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, शकुंतला वागलगावे, सहायक फौजदार भगवान नाडगे, हवालदार विकास पाटणकर, महेशकुमार जिनगर, मनीषा कोरे, संदीप तेली, अभिजित गायकवाड, सीमा पाटील, शरद कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
पालकांसमोर समुपदेशन
कॉफी हाऊसमध्ये सापडलेल्या प्रेमीयुगुलांच्या पालकांशी पथकाने संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. पोलीस समुपदेशन समितीमधील सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील यांनी त्यांचे समुपदेशन केले. असे प्रकार करताना आढळून आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.