खासगी रुग्णालयावर मिरजेत ‘आयकर’चा छापा

By Admin | Updated: January 19, 2017 00:03 IST2017-01-19T00:03:17+5:302017-01-19T00:03:17+5:30

खासगी रुग्णालयावर मिरजेत ‘आयकर’चा छापा

Print Print E-mail on private hospital | खासगी रुग्णालयावर मिरजेत ‘आयकर’चा छापा

खासगी रुग्णालयावर मिरजेत ‘आयकर’चा छापा


मिरज : येथील एका नामांकित खासगी रुग्णालयावर बुधवारी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. यादरम्यान आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू होती.
शहरातील एका नामांकित अस्थिव्यंग तज्ज्ञाच्या रुग्णालयामध्ये दुपारी आयकर विभागाच्या पुणे विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पथकाने छापा टाकला. रुग्णालयातील आर्थिक व्यवहाराची पडताळणी सुरू केली. मात्र याबाबत आयकर अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. आयकर विभागाच्या छाप्याच्या वृत्तामुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटांचा सर्वाधिक भरणा केलेले मिरजेतील आणखी काही वैद्यकीय व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहेत. त्यांच्याही खात्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)

Web Title: Print Print E-mail on private hospital