शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 21:08 IST

सांगली मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकणाऱ्या सुबोधसिंग याच्या टोळीतील संशयित प्रिन्सकुमार शिवनाथ सिंग याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.

सांगली मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकणाऱ्या सुबोधसिंग याच्या टोळीतील संशयित प्रिन्सकुमार शिवनाथ सिंग (वय २७, रा. तानापूर, दिलावरपूर, जि. वैशाली, बिहार) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. डेहराडून कारागृहातून त्याचा ताबा घेण्यात आला. आतापर्यंत दरोड्यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर तिघेजण अद्याप पसार आहेत.

मार्केट यार्ड परिसरातील रिलायन्स ज्वेल्सवर ४ जून २०२३ रोजी दरोडेखोरांनी पोलिस असल्याचे सांगून भरदुपारी सशस्त्र दरोडा टाकला. सर्व कर्मचाऱ्यांचे हातपाय बांधून ६ कोटी ४४ लाख रुपयांच्या दागिन्यांची लूट केली. दरोडा टाकताना आतमध्ये आलेला एक ग्राहक हा प्रकार पाहून पळून जात असताना त्याच्या दिशेने गोळीबारही करण्यात आला. सुदैवाने ग्राहक बचावला. भरदुपारी टाकण्यात आलेल्या दरोड्यामुळे पोलिस दलासमोर आव्हान उभे राहिले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषणसह विश्रामबाग पोलिसांनी दोन महिने दरोड्याचा कसून तपास करताना सुबोधसिंग याच्या टोळीने हा दरोडा टाकल्याचे निष्पन्न केले. सांगलीनंतर ओडिशात रिलायन्स ज्वेल्सवर दरोड्याचा प्रयत्न झाला. त्यात सहभागी अंकुरप्रताप सिंग हा सांगलीतील दरोड्यात वाहनचालक असल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सुबोध सिंग हा खरा सूत्रधार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मुख्य सूत्रधार सुबोध सिंग, महंमद मुख्तार, शशांक ऊर्फ सोनू धनंजयकुमार सिंग, एसपी ऊर्फ अनिल सोहनी या चौघांना अटक केली.

तपासात प्रिन्सकुमार याचे नाव निष्पन्न झाले होते. सांगलीतील दरोड्यानंतर टोळीने डेहराडून येथे दरोडा टाकला होता. त्यावेळी प्रिन्सकुमारला अटक केली होती. तो डेहराडून कारागृहात होता. विश्रामबाग पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. ट्रांजिट रिमांडद्वारे सांगली कारागृहात आणले. तेथून विश्रामबाग पोलिसांनी ताबा घेतला.

दरोड्यात दुचाकी पुरवलीप्रिन्सकुमार याला विश्रामबाग पोलिसांनी रिलायन्स ज्वेल्समध्ये तपासासाठी आणले. त्याने दरोड्यावेळी दुचाकी पुरवल्याचे सांगितले. दुचाकी कर्नाटकातील असून लातूर येथून घेतल्याचे कबूल केले. दरोड्यानंतर मिरजेजवळ ही दुचाकी टाकून दिली होती. त्यानंतर दरोडेखोर मोटारीतून पळाले होते.

पसार तिघांचा शोधरिलायन्स दरोड्यात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरोड्यातील संशयित गणेश उद्धव बद्रेवार (रा. हैद्राबाद), प्रताप अशोकसिंग राणा (रा. वैशाली, बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (रा. हुगळी, पश्चिम बंगाल) या तिघांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीRobberyचोरी