शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

प्रधानमंत्री पीक विमा योजना : कंपन्यांनी शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 2:30 PM

खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख २४ जुलै आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केवळ ६ दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, यासाठी विमा कंपन्यांनी जिल्हा आणि तालुका स्तरावर शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिल्या.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विमा योजना : कंपन्यांनी शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करावेसांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या सूचना

सांगली : खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची अंतिम तारीख २४ जुलै आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केवळ ६ दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी व्हावे, यासाठी विमा कंपन्यांनी जिल्हा आणि तालुका स्तरावर शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी येथे दिल्या.प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना या दोन्हीयोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस कृषिउपसंचालक सुरेश मगदूम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर. पी. यादव, विमा कंपन्यांचे आणि बँकांचेप्रतिनिधी आर. एस. बिरनाळे, सुभाष कदम, एस. एम. कोळी, व्ही. एस. यादव, अतुल झनकर, दिग्विजयकापसे, दीपक सोनवणे, श्री. सिंग आदि उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, पीक विम्यासाठी विमा कंपन्यांनी तालुका आणि जिल्हास्तरावर शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करावे. त्याचा पत्ता व संपर्क क्रमांकांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, यासाठी गावस्तरावर प्रसिद्धी करावी. त्याबरोबरच पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना वेळेत मिळावी, यासाठीही विमा कंपन्यांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कृषि विभागाने विमा कंपन्यांनी सादर केलेल्यामाहितीची फेर तपासणी करावी. तसेच, पीक विम्याबाबतच्या तक्रारीसाठी तालुका स्तरावर तालुका कृषिअधिकारी आणि जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालय येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे, असेत्यांनी सांगितले.खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना 10 अधिसूचित पिकांसाठी एकूण 278अधिसूचित महसूल मंडळांमध्ये, मंडळगट स्तरावर राबवण्यात येणार आहे. तसेच, मका आणि तूर याअधिसूचित पिकांसाठी, एकूण तालुका गटस्तरावर ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया, मुंबईमार्फतराबविण्यात येत आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, या योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बिगर कर्जदारशेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, जवळच्या प्राधिकृत बँका/ प्राथमिक कृषि पत पुरवठा करणाऱ्या संस्था/संबधित विमा कंपनीची कार्यालये किंवा विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून विमा प्रस्ताव विहीत प्रपत्रात,योग्य त्या विमा हप्त्यासह, आधार कार्ड/ आधार नोंदणीची प्रत, 7/12 व 8 अ चा उतारा, पेरणीचा दाखलाकिंवा पेरणी घोषणा पत्र, बँक पासबुकाची प्रत, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा/सहमतीपत्र, मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव विहीत वेळेत सादर करावा.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली