शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

सांगलीतील रस्त्याला देणार 'पंतप्रधान नरेंद्र मोदीं'चं नाव, महापालिकेला 1 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 2:54 PM

सांगली ते पेठदरम्यान रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास या रस्त्याला ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे’ असे नामकरण करण्याचा निर्धार शुक्रवारी रस्ता बचाव कृति समितीच्या बैठकीत करण्यात आला.

सांगली : सांगली ते पेठदरम्यान रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास या रस्त्याला ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सप्रेस वे’ असे नामकरण करण्याचा निर्धार शुक्रवारी रस्ता बचाव कृति समितीच्या बैठकीत करण्यात आला. तसेच सांगली-कोल्हापूर रस्त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव देण्याबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार, महापौर यांची नावे रस्त्याला देण्यावर बैठकीत एकमत झाले. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेला 1 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

सांगली-पेठ रस्त्यासह महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत सर्वपक्षीय कृति समितीने आंदोलन हाती घेतले आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेठ रस्त्यावर दिवे लावण्यात आले होते. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टक-यांची दौलत येथे समितीची बैठक झाली. या बैठकीला हमाल पंचायतीचे नेते बापूसाहेब मगदूम, जिल्हा सुधार समितीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे, नगरसेवक गौतम पवार, प्रशांत पाटील मजलेकर, हेमंत खंडागळे, आसीफ बावा, स्वाभिमानीचे सचिव सतीश साखळकर, मनसेचे अमर पडळकर, आशीष कोरी, शिवसेनेचे शंभुराज काटकर, राष्ट्रवादीचे सागर घोडके, अश्रफ वांकर उपस्थित होते. बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका क्षेत्रातील रस्त्याबाबत चर्चा झाली. सांगली-पेठ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला जाणार आहे. तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून नवीन रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली.

महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यावरही भर देण्यात आला. त्यासाठी एक जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. सांगली-पेठ, सांगली- कोल्हापूर या शहराला जोडणा-या प्रमुख मार्गासह महापालिका हद्दीतील रस्त्यांची कामे हाती घेतली नाही तर नववर्षाच्या प्रारंभीच राजकीय नेत्यांची नावे या रस्त्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून महापौरांपर्यंत सा-यांचीच नावे रस्त्याला देऊन निषेध व्यक्त केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली जाते. त्यामुळे त्याचा दर्जा राहत नाही.परिणामी ठेकेदाराच्या टक्केवारीला चाप लावून रस्त्यांची कामे दर्जेदार होण्याकडेही कृति समिती लक्ष घालणार आहे.  रविवारी लाँग मार्चसांगली-पेठ रस्त्याबाबत कृति समितीच्यावतीने आंदोलन हाती घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी रविवार 5 नोव्हेंबरला सांगली ते तुंगपर्यंत मोटारसायकलीवरून लाँग मार्च काढला जाणार आहे. तर इस्लामपूर कृति समितीकडून पेठ ते तुंगपर्यंत लाँगमार्च निघेल. तुंग येथे दोन्ही समिती एकत्र आल्यानंतर तिथे जाहीर सभा होणार असल्याचे सुधार समितीचे अमित शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी