शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

धान्य, डाळींचे दर वाढले! घरगुती किराणाचा खर्च तब्बल १५ टक्क्यांनी वाढला

By अशोक डोंबाळे | Updated: August 19, 2023 16:49 IST

पेट्रोल, डिझेलसह खाद्यतेल ही महाग झाले आहे. महागाईच्या तीव्र झळा सर्वसामान्य नागरिकांना सोसाव्या लागत आहेत.

सांगली: पेट्रोल, डिझेलसह खाद्यतेल ही महाग झाले आहे. महागाईच्या तीव्र झळा सर्वसामान्य नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. त्यात आता पुन्हा घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे किचनचे बजेट कोलमडले आहे. हॉटेल तर दूरच, पण घरचे जेवणही महाग झाले, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर येऊन ठेपली आहे. तूर डाळ घरासाठी लागणारा भाजीपाला, कडधान्यांच्या किमतीत गेल्या दोन महिन्यांत १५ ते २० टक्के वाढ झाल्याने सर्वांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. जून महिन्याच्या तुलनेत आता घराचा किचनचा खर्च साधारण २० टक्क्यांनी वाढल्यामुळे खिशाला झळ बसली आहे.

महागाईमुळे हॉटेल चालकांनी खाद्यपदार्थांच्या किमतीत साधारणतः १५ ते २० टक्के वाढ केली आहे. महागाईमुळे खर्च परवडेनासा झाला आहे. हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ केल्याने वडापाव पासून ते जेवणाच्या थाळीपर्यंत सर्वच महाग झाले आहे. त्यामुळे हॉटेलचे जेवण आता परवडेनासे झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सुटीच्या दिवशी चेंज म्हणून अथवा कोणी पाहुणे आल्यास हॉटेलला जाणे आता खिशाला चटका लावणारे ठरत आहे.

जून महिन्याच्या तुलनेत किती महागले?जूनचे दर, सध्याचे दर, वाढशेंगदाणा - १२०, १४०, २७ज्वारी - ५०, ६०, २०तूर डाळ - १३०, १५०, २०गहू - ३१, ३६, २६हरभरा डाळ - ६०, ७०, १४मूग डाळ - ९५, ११५, १८साखर - ३८, ४२, २१ धान्य व कडधान्यात १५ ते २० टक्के वाढ झालेली आहे. तूर डाळ व चना डाळीची मागणी जास्त आणि साठा कमी आहे. पावसाचा परिणाम तसेच आवक घटल्याने भाववाढ होते. डाळींचे दर दिवाळीनंतर कमी होतील. - महावीर पाटील, धान्याचे व्यापारी.

टॅग्स :Sangliसांगली