जत तालुक्यात वळीव पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:28 IST2021-04-27T04:28:15+5:302021-04-27T04:28:15+5:30

फोटो ओळ : जालिहाळ खुर्द (ता.जत) येथील वळीव पावसाने खळ्यावरील वैरण भिजली आहे. लोकमत न्यूज नेटवर्क संख : जत ...

Presence of torrential rains in Jat taluka | जत तालुक्यात वळीव पावसाची हजेरी

जत तालुक्यात वळीव पावसाची हजेरी

फोटो ओळ : जालिहाळ खुर्द (ता.जत) येथील वळीव पावसाने खळ्यावरील वैरण भिजली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : जत तालुक्यात सोमवारी सायंकाळी वळीव पावसाने हजेरी लावली. विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडासह दुपारी ४ वाजता पाऊस पडला. या पावसाने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला. उन्हाळी पिकांना व खरड छाटणी झालेल्या द्राक्षे बागांना याचा फायदा होणार आहे.

तालुक्यात दुपारी ४नंतर अचानक ढगांची दाटी झाली. ५ वाजता पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील मुचंडी, दरीकोणूर, लकडेवाडी, दरीबडची, जालिहाळ खुर्द, सिध्दनाथ, संख परिसरात पावसाने हजेरी लावली. आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढला होता. सोमवारी दिवसभर ४० अंश सेल्सिअस तापमान होते.

दिवसभर हवेत प्रचंड उकाडा होता. अचानक पावसाने हजेरी लावल्याने रानात गेलेल्या जनावरांची तारांबळ उडाली. विजेचा कडकडाट, ढगांच्या गडगडाट, जोरदार वाऱ्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता.

सुसलाद येथे नारळाच्या झाडावर वीज पडली.

सध्या ज्वारी, गहू पिकांची काढणी, मळणी झाली आहे. या पावसाने वैरण भिजली आहे. उन्हाळी भुईमूग, मका, भाजीपाला, ऊस पिकांना व खरड छाटणी केलेल्या द्राक्षे बागांना गरज असताना पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

चाैकट

काढणीतील बागा अडचणीत

पूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी परिसरात शेतकऱ्यांच्या बागा काढणीला आल्या आहेत. पावसाने परिपक्व बागांचे नुकसान होणार आहे. पावसाचा ३० एप्रिलपर्यंत पाऊस पडणार आहे, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे अडचणी वाढणार आहेत.

Web Title: Presence of torrential rains in Jat taluka