शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वाळवा-शिराळ्यात घड्याळाच्या बेरजेत कमळ फुलविण्यासाठी मोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 18:21 IST

सत्यजित देशमुख आणि सम्राट महाडिक सरसावले

अशोक पाटीलइस्लामपूर : शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार मानसिंगराव नाईक यांच्या माध्यमातून विकास झाल्याचा दावा नाईक समर्थकांचा आहे. त्यातच माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची ताकद आणि त्यांनी केलेल्या विकासाची बेरीज एकत्रित आली आहे. या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधात भाजपचे सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांनी विकासकामाच्या निधीच्या घोषणा करत कमळ फुलवण्यासाठी मोट बांधली आहे.शिराळा मतदारसंघात देशमुख-नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष नेहमीच चर्चिला जात होता. या दोन गटाव्यतिरिक्त नाईक घराण्यातील भाऊबंदकीच्या राजकारणात माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि आमदार मानसिंगराव नाईक अशा दोन गटाच्या निर्मितीने शिराळ्यात तीन मातब्बर गटांची चर्चा होती. मागील विधानसभा निवडणुकीपासून वाळवा तालुक्यातील ४८ गावांतील नेतृत्व राहुल आणि सम्राट महाडिक बंधूंच्या रूपाने पुढे आले. त्यामुळेच राजकीय समीकरणे बदलत गेली आहेत.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा बदलता राजकीय प्रवास पाहता त्यांच्या गटाला घरघर लागली आहे. याचाच फायदा राष्ट्रवादीने उठवला. अखेर नाईक गट राष्ट्रवादीच्या गळाला लागला. त्या अगोदरच काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील सत्यजित देशमुख यांनी काँग्रेस निष्ठा बाजूला ठेवून भाजपला ताकद दिली.मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप यांच्यातील संघर्ष आणि त्यातच सम्राट महाडिक यांची बंडखोरी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या पथ्यावर पडली. महाडिक गटाला मिळालेली ५० हजार मते महाडिक बंधूंच्या भाजप प्रवेशाने बेरजेचे राजकारण ठरले.त्यातच भाजपमध्ये असलेला सत्यजित देशमुख गट अशा दोन्ही गटांच्या नेत्यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजपच्या ताकदीवर शिराळा तालुक्यात विकासाची गंगा वाहण्यासाठी घोषणांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. सम्राट महाडिक यांच्यापुढे विधानसभा, तर सत्यजित देशमुख यांच्यापुढे विधान परिषदेवर आमदार होण्याचे स्वप्नच बाकी आहे.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस