आरळा येथे वडाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:17+5:302021-06-25T04:20:17+5:30
फोटो ओळ : आरळा (ता. शिराळा) येथील वडाच्या झाडाची पूजा करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी शिक्षक जितेंद्र लोकरे यांनी चिमुकल्यासोबत सात ...

आरळा येथे वडाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
फोटो ओळ : आरळा (ता. शिराळा) येथील वडाच्या झाडाची पूजा करून त्याच्या दीर्घायुष्यासाठी शिक्षक जितेंद्र लोकरे यांनी चिमुकल्यासोबत सात फेरे घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : ‘वृक्षतोड करू नका... झाडे लावा - झाडे जगवा’ असा संदेश देत वडाच्या झाडाला फेरे मारून या झाडासाठी दीर्घायुष्य मागण्याचे काम उपक्रमशील शिक्षक जितेंद्र लोकरे यांनी चिमुकल्यासोबत केले.
शिराळा तालुक्यातील आरळा येथे पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षांच्या दीर्घायुष्यासाठी जितेंद्र लोकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत वडाच्या झाडाला सात फेरे घातले. वृक्षतोडीमुळे बरेचसे पुरातन वृक्ष नामशेष होऊ लागले आहेत. याचा मानवी जीवनावर भयंकर विपरीत परिणाम होत आहे. म्हणूनच वटपौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाला सात फेऱ्या घालतात; पण तेच झाड नामशेष झाले तर हा सण भविष्यात साजराच होणार नाही. म्हणून वडाच्या झाडाला जन्मोजन्मी दीर्घायुष्य लाभो यासाठी ग्रामीण भागातील लोकरे यांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधून मुलांसोबत झाड चिरंतन राहो यासाठी आरळा येथील वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारल्या. या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.