प्रतीक पाटील यांचा गजराजाकडून सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:25 IST2021-01-21T04:25:01+5:302021-01-21T04:25:01+5:30
इस्लामपूर : युवा नेते प्रतीक पाटील यांची व्हॉलिबॉल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष, युवक राष्ट्रवादीचे ...

प्रतीक पाटील यांचा गजराजाकडून सत्कार
इस्लामपूर : युवा नेते प्रतीक पाटील यांची व्हॉलिबॉल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष, युवक राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनोखा सत्कार केला. कारखाना कार्यस्थळावर राजारामबापू पाटील पुतळ्याससमोर विट्याच्या गजराजाच्या सोंडेतून प्रतीक पाटील यांना पुष्पहार प्रदान करण्यात आला. यावेळी शैलजादेवी पाटील यांनी गजराजाची पूजा केली.
यावेळी सुनील पोळ, ब्रह्मनंद पाटील, प्रदीप चव्हाण, उमेश पवार, संभाजी पाटील, नामदेव मोहिते, दिलीप कदम उपस्थित होते.
फोटो ओळी - २००१२०२१-आयएसएलएम-प्रतीक सत्कार न्यूज
राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर प्रतीक पाटील यांचा सत्कार करताना गजराज. यावेळी संजय पाटील, उमेश पवार, ब्रह्मानंद पाटील, संभाजी पाटील, नामदेव मोहिते, विनोद बाबर, अजित बारवडे उपस्थित होते.