शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

ज्या द्राक्षबागेवर जिवापाड प्रेम केलं त्याच ठिकाणी प्रतापरावांनी जीवन संपवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 11:07 IST

लहरी हवामानानं उद्धवस्त केलं प्रगतशील शेतकऱ्याचं स्वप्न

वैभव केंगारलोकमत न्यूज नेटवर्क

कवठेमहांकाळ : बागेत डोलणाऱ्या हिरव्यागार द्राक्षमण्यांसोबत आर्थिक प्रगतीच्या पायऱ्या चढत मळणगावच्या शेतकऱ्याने अनेक स्वप्नं रंगवली... ओंजळीत ज्या निसर्गानं भरभरुन दान दिलं त्यानंच नंतर सारं हिसकावून घेतलं. हिरव्या बागेला काळ्या छायेत जाताना पाहून त्यांचं मन सुन्न झालं. कर्जाचा डोईवरचा भारही वाढत गेला. शेतातल्या ज्या आंब्याच्या झाडाखाली कधी समाधानाचा घास घेतला होता त्याच झाडावर त्यांनी गळफास घेतला अन् अखेरचा श्वासही.

मळणगावच्या शिवारात मंगळवारची सकाळ उगवली, पण यावेळी नेहमीची लगबग नव्हती. वातावरणात एक स्मशान शांतता होती. काही क्षणांतच ती शांतता काळजाला भिडणाऱ्या वेदनेत बदलली आणि गावाने एका कष्टकरी शेतकऱ्याला कायमचे गमावले. प्रतापराव श्रीपतराव शिंदे..हे नाव गावात आदरानं घेतलं जायचं. मनमिळाऊ, शांत स्वभाव आणि प्रगतशील द्राक्षबागायतदार म्हणून त्यांची ओळख होती. तीन एकरात उभी केलेली द्राक्षबाग म्हणजे त्यांचं विश्व होतं. दिवस-रात्र मेहनत करून त्यांनी ही बाग उभी केली होती. आधुनिक पद्धतींचा अवलंब, योग्य व्यवस्थापन, वेळोवेळी केलेली निगा या सगळ्यामुळे ते प्रगतशील शेतकरी म्हणून गावात आदर्श मानले जात होते. याच बागेने त्यांच्या संसारात सुखाचे क्षण फुलविले. मुलांच्या उच्च शिक्षणाच्या वाटा तयार केल्या.

सारं सुरळीत सुरु असतानाच निसर्गाने त्यांची साथ सोडली. कधी अवकाळी पाऊस, कधी द्राक्षबागेवर रोगराई, तर कधी अनियमित तापमान या सगळ्यांनी त्यांच्या बागेवर मोठा परिणाम केला. त्यामुळे विकास सोसायटी व बँकेकडून काढलेल्या कर्जाचा बोजा वाढला. आर्थिक विवंचनेतून त्यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला.

जुने फेडण्यासाठी नवे कर्ज

सोसायटी व अन्य जुने कर्ज फेडण्यासाठी प्रतापरावांनी एका बँकेतून कर्ज घेतले. बँकेच्या हप्त्याचा ताण वाढला. आर्थिक गणित बिघडलं. उत्पन्नाचे पारडे खाली अन् खर्च, कर्जाचे पारडे वर गेले.

स्वतःच्या हाताने बाग तोडलीतीन एकर द्राक्षबागेला यंदा द्राक्षे लागलीच नाहीत. वर्षभर केलेली मेहनत, घातलेला खर्च, केलेली धडपड सगळं वाया गेलं. शेवटी निराश होऊन त्यांनी स्वतःच्या हाताने उभी केलेली बाग तोडून टाकली. ज्या बागेसाठी आयुष्य वेचले तीच बाग संपवावी लागल्याने ते खचले.

मुलांना अधिकारी झालेलं पहायचं होतं

मुलगा इचलकरंजी येथे अभियांत्रिकी शिक्षण घेत आहे तर मुलगी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. त्यांच्या भविष्यासाठी प्रतापरावांनी अनेक स्वप्ने पाहिली होती. त्यांना अधिकारी झालेलं पहायचं होतं. पण हे स्वप्न भंगलं. पत्नी अन् मुलांची त्यांची साथ सुटली.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer ends life at grape farm he passionately cultivated.

Web Summary : Burdened by debt after crop failure, farmer Prataprao Shinde ended his life. He nurtured a grape farm, but nature's wrath and financial strain led to the tragic decision, leaving his family in sorrow.
टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी