शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शेकडो झाडांना जीवदान देणारा पर्यावरणप्रेमी, ताकारीतील सपाटे कुटुंबाला वनरक्षक पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:06 IST

सयाजी शिंदे यांच्याकडून कौतुकाची थाप

नितीन पाटीलबोरगाव : सध्या वैयक्तिक स्वार्थासाठी आज झाडांची कत्तल करून निसर्ग धोक्यात येत असताना एका साॅ मिल मालकाने नामी पर्यावरणाचा वसा जपत वटवृक्ष पुनर्रोपणाचा मार्ग अवलंबून आजवर शेकडो झाडांना जीवदान देत त्यांना पालवी फोडण्याचे काम केले आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' या वाक्याचा अवलंब करत ताकारी (ता. वाळवा) येथील प्रकाश सपाटे कुटुंबाने वनरक्षक हा बहुमान प्राप्त केला आहे.वाळवा तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहेत. अशा वेळी रस्त्याकडेचे महाकाय वटवृक्ष जमीनदोस्त होत होते. त्या परिसरातील अनेक लोकांच्या भावना, आठवणी, प्रसंग या वटवृक्षात सामावले होेते तसेच अनेक आठवणीही गुंतल्या होत्या. मात्र वृक्षतोड हाच अंतिम मार्ग होता. जनतेला वृक्षतोड पाहण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. लोकांची ही लोकभावना ताकारीतील सॉ मिलचे मालक प्रकाश सपाटे कुटुंबाने ओळखली.वटवृक्ष व झाडे वाचायला हवीत यासाठी त्यांनी पुणे-बंगळुरू-सांगली महामार्गावरील व अन्य रस्त्याकडेची झाडे मुळासकट काढून, क्रेनच्या माध्यमातून तांबवे, येलूय, ताकारी, दुधारी, मसुचीवाडी या गावांतील स्मशानभूमीत व रिकाम्या गावठाणात आजवर शेकडो झाडांचे पुनर्रोपण केले. त्या झाडांचे ग्रामस्थांनीही चांगले संगोपन केले. जमिनीत पुन्हा मुळे रोवत नव्याने श्वास घेण्यास सुरुवात केली आहे. अनेक झाडांना पालवी फुटून नव्याने झाडे डोलू लागली आहेत.नुकताच असा पुन्हा एकदा प्रयोग सपाटे यांनी दुधारी येथील स्मशानभूमीत केला. त्याला यश आले.वडाच्या झाडाला जीवदान देण्याच्या अनोख्या उपक्रमात पंचायत समिती सदस्य रूपाली सपाटे, वाळवा तालुका सॉ मिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सपाटे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सपाटे कुटुंब वृक्षतोड नाही करत तर वृक्षसंवर्धन व पुनर्रोपणाचे काम करत असल्याने समाजासमोर त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवला आहे.

सयाजी शिंदे यांच्याकडून कौतुकाची थापएकीकडे वृक्षतोडीमुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन साॅ मिल मालक असतानाही आमच्या कुटुंबाने वृक्षतोड करण्यापेक्षा वृक्षसंवर्धन व वृक्षप्रत्यारोपणाचा मार्ग निवडला आहे. गेल्या दोन वर्षांत सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत १२१ झाडांचे पुनर्रोपण केले आहे. या कामाची पोच म्हणून अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेटून कौतुक केले आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व सांगली जिल्हा वनप्रमुख नीता कट्टी यांनी वनरक्षक म्हणून गौरविल्याचे प्रकाश सपाटे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli's Sapate Family Honored for Saving Hundreds of Trees

Web Summary : The Sapate family from Takari, Sangli, is saving trees by replanting them. They've rescued hundreds from road construction, earning the 'Vanrakshak' award for their dedication to environmental preservation and inspiring community involvement.