‘ज्ञानशिदोरी’ उपक्रमांतर्गत ग्रंथ व पुस्तक प्रदर्शनाचा उपक्रम स्तुत्य : अरुण सुळगेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:26 IST2021-01-20T04:26:31+5:302021-01-20T04:26:31+5:30
कामेरी : विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या हितासाठी विवेकानंद शिक्षण संस्थेने ज्ञान शिदोरी उपक्रमांतर्गत सर्व शाखांमध्ये ग्रंथ व पुस्तक प्रदर्शन ...

‘ज्ञानशिदोरी’ उपक्रमांतर्गत ग्रंथ व पुस्तक प्रदर्शनाचा उपक्रम स्तुत्य : अरुण सुळगेकर
कामेरी : विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या हितासाठी विवेकानंद शिक्षण संस्थेने ज्ञान शिदोरी उपक्रमांतर्गत सर्व शाखांमध्ये ग्रंथ व पुस्तक प्रदर्शन आयोजन सुरू केले आहे. वाचनाने मनुष्य समृद्ध होतो. त्यामुळे वाचन संस्कृती वाढून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल, असा विश्वास विद्या समिती प्रमुख अरुण सुळगेकर यांनी व्यक्त केला.
ते कामेरी (ता. वाळवा) येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहानिमित्ताने डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय व छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूलमध्ये आयोजित ‘ज्ञान शिदोरी’ उपक्रमाअंतर्गत आयोजित ग्रंथ, पुस्तक प्रदर्शन व पुस्तक वाटप कार्यक्रमात बोलत होते. जयश्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होत्या.
जयश्री पाटील म्हणाल्या, वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे आधुनिक काळामध्ये विद्यार्थ्याला संगणकाबरोबरच वाचनाची गोडी निर्माण व्हायला पाहिजे. यासाठी शालेय स्तरावर असे उपक्रम होणे गरजेचे आहे.
प्राचार्य एस. एम. गवळी यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाळेला पुस्तके भेट दिली. विद्यार्थ्यांनी वाचनाचा आनंद लुटला.
यावेळी अशोक जाधव, गुंडा माळी, अर्जुन कदम, पी. एस. चौगले, ए. डी. पेडणेकर, एस. एम. पाटील, एस. के. मगदूम, डी. बी. पाटोळे उपस्थित होते .स्वागत मुख्याध्यापक एस. बी. जाधव यांनी केले. उमेश मिनेकर यांनी सूत्रसंचालन केले. ए. डी. दुधारे यांनी आभार मानले.
फोटो ओळी-१९०१२०२१-आयएसएलएम- कामेरी न्यूज
कामेरी (ता. वाळवा) येथे डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय व छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘ज्ञान शिदोरी’ उपक्रमाअंतर्गत आयोजित ग्रंथ व पुस्तक प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी सुळगेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य एस. एम. गवळी, मुख्याध्यापक एस. बी. जाधव, अशोक जाधव, अर्जुन कदम उपस्थित हाेते.