प्रभाकर गाडगीळ यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:32 IST2021-09-10T04:32:00+5:302021-09-10T04:32:00+5:30

सांगली : येथील मे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीचे ज्येष्ठ संचालक व सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांचे ...

Prabhakar Gadgil passed away | प्रभाकर गाडगीळ यांचे निधन

प्रभाकर गाडगीळ यांचे निधन

सांगली : येथील मे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ पेढीचे ज्येष्ठ संचालक व सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांचे चुलत बंधू प्रभाकर ऊर्फ अरुणदादा शंकर गाडगीळ यांचे (वय ८२) निधन झाले. सुरुवातीला ते पूर्णवेळ सराफी पेढीचे काम पाहत असत. त्यांना शेतीमध्ये आवड असल्याने ५० वर्षे त्यांनी मिरज तालुक्यातील सलगरे येथे शेती केली. शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याकडे त्यांचा कल होता. त्यांचा स्वभाव शांत, मनमिळावू होता. सांगली ब्रिज असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. सांगली रोटरीचे सदस्य होते. त्याचबरोबर अनेक सामाजिक कामात त्यांनी हिरीरीने भाग घेतला. त्यांच्या निधनाने सराफी, शेती व सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. पेढीचे संचालक राजीव व समीर गाडगीळ यांचे वडील होत.

Web Title: Prabhakar Gadgil passed away