पुस्तकात आयुष्य बदलण्याची ताकद ; विद्यार्थ्यांनीच सांभाळली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:20 AM2020-02-26T00:20:48+5:302020-02-26T00:24:11+5:30

केंद्रे म्हणाले की, लेखन ही ज्ञानाची पुढची पायरी आहे. अक्षरांच्या जगानं अनेक मुलांचे विश्व सजलेले आहे. लहान मुलांची पुस्तके काढणे व संमेलन घेणे ही सांगलीची बाल चळवळ मराठी जगतात महत्त्वाचं स्थान निर्माण करेल, असा विश्वास वाटतो.

 The power to change lives in a book | पुस्तकात आयुष्य बदलण्याची ताकद ; विद्यार्थ्यांनीच सांभाळली जबाबदारी

कुपवाड येथे विद्यार्थी साहित्य संमेलनात ‘गौतमच्या कविता’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बाळू गायकवाड, मुश्ताक पटेल, शशिकांत नागरगोजे, एस. एन. पाटील, समृद्धी नागरगोजे, गौतम पाटील, प्राचार्य रमेश व्होस्कोटी, किरण केंद्रे, नामदेव माळी, पृथ्वीराज तौर, कृष्णात पाटोळे आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्दे किरण केंद्रे : कुपवाडला सहावे विद्यार्थी साहित्य संमेलन

कुपवाड : पुस्तकाचे जग खूप सुंदर जग आहे. आयुष्य बदलण्याची ताकद पुस्तकात आहे. त्यामुळे पुस्तकाचा हातात धरलेला हात कधीच सोडू नका, असे प्रतिपादन किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांनी केले.
कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली शैक्षणिक संकुलात मंगळवारी साहित्य संमेलनाचे उद्घाटन किरण केंद्रे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी समडोळी हायस्कूलचा बालकवी गौतम पाटील होता, तर स्वागताध्यक्षपदी समृद्धी नागरगोजे होती.

केंद्रे म्हणाले की, लेखन ही ज्ञानाची पुढची पायरी आहे. अक्षरांच्या जगानं अनेक मुलांचे विश्व सजलेले आहे. लहान मुलांची पुस्तके काढणे व संमेलन घेणे ही सांगलीची बाल चळवळ मराठी जगतात महत्त्वाचं स्थान निर्माण करेल, असा विश्वास वाटतो.

दुसऱ्या सत्रात साहित्यिक पृथ्वीराज तौर यांची मुलाखत विद्यार्थ्यांनी घेतली. यावेळी तौर म्हणाले की, लिहिण्यापेक्षा जास्त वाचले पाहिजे. कविता दु:खाचा, सहानुभूतीचा, अंत:करणाचा शब्द असतो. सुरवंटामधील फूलपाखरू ओळखणे गरजेचे बनले आहे. साहित्य संमेलने ही मुलांना अभिव्यक्तीचे पंख असल्याची जाणीव करून देतात, हे महत्त्वाचे आहे.

शेवटच्या सत्रात अस्मिता विश्वास चव्हाण हिच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन पार पडले. या कविसंमेलनात जिल्ह्यातील ५७ कवींनी सहभाग घेतला. याप्रसंगी मच्छिंद्र ऐनापुरे यांच्या बालकथा संग्रहाचे व गौतम पाटील यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. ग्रंथदिंडी प्रदर्शन व साहित्यसुमनांनी हे संमेलन विद्यार्थीमय झाले होते.
संमेलनाचे संयोजन जिल्हा परिषद, शिक्षण विभाग डायट व दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांनी केले. दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, ताई गवळी, सुषमा डांगे, बाबासाहेब परीट, स्वाती शिंदे-पवार, रघुवीर अथणीकर, वनिता पाटील, प्राचार्य डॉ. रमेश होसकोटे, डॉ. अंजली रसाळ, मुस्ताक पटेल, तुकाराम गायकवाड, विश्वास आठवले, शशिकांत नागरगोजे, चित्रकार संतोष पाटील, राजाराम केंगार, अमोल माने, शशिकांत कांबळे, सुरेश पवार, गौतम कांबळे आदींनी संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनंदा वाखारे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी, तुकाराम राजे, मेहबूब जमादार, अभिजित पाटील, नामदेव भोसले, भीमराव धुळूबुळू , अश्विनी कुलकर्णी, वर्षा चौगुले, वंदना हुलबत्ते, मनीषा पाटील, वसंत पाटील, सुरेखा कांबळे, अनिल कुमार पाटील, महेश कुमार कोष्टी उपस्थित होते.


विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचा मानस
तुम्ही लेखन करावे असे मला वाटते. कवितेत मन मुक्त होते. थोडक्या शब्दात खूप सांगतो तो साहित्यिक. कधी कधी डोळ्यातून पाणी येते आणि लेखनातून शब्द येतात. माणूस मरतो, पण साहित्य मरत नाही. म्हणूनच माझ्याबरोबर तुम्हालाही लिहिते करण्याचा मानस आहे, असे मत विद्यार्थी साहित्य संमेलनाध्यक्ष गौतम पाटील याने व्यक्त केले.


प्रसंगकथन आणि लेखकांशी गप्पा
प्रसंगकथन सत्रामध्ये दहा विद्यार्थी साहित्यकांनी अनुभव-प्रसंग कथन केले. यामध्ये कथा, महापूर, दुष्काळ यासारख्या प्रसंगांचे कथन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी भाटशिरगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा विश्वजित माने हा विद्यार्थी होता. यानंतर पुस्तकातील लेखक हनुमंत चांदगुडे, संदीप नाझरे, मनोहर भोसले यांच्याशी मुलांनी मुक्त गप्पा मारल्या. त्यांचा लेखन प्रवास मुलांना प्रेरणादायी ठरला.

 

Web Title:  The power to change lives in a book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली