शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

इस्लामपुरात तोफा धडाडण्याच्या अगोदरच थंडावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 16:14 IST

जयंत पाटील यांची जयंत एक्स्प्रेस इच्छुक कार्यकर्त्यांनी फुल झाली होती. त्यानंतर शिवसेनेतील बंडाळीने महाविकास आघाडीला धक्का बसला. त्यामुळेच जयंत एक्स्प्रेसमधील काही डबे रिकामे झाल्याची चर्चा आहे.

अशोक पाटीलइस्लामपूर : शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे बंडखोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील श्रेयवाद चांगलाच पेटला आहे. ऑगस्टमध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या, तर आता शिंदेशाही सरकार आल्यानंतर निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. पालिकेसाठी शहरात धडाडणाऱ्या तोफा आता पुन्हा थंडावल्या आहेत.तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगराध्यक्ष, सरपंच या निवडी सदस्यांतूनच होणार असल्याचे जाहीर केले होते, तर पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम ऑगस्ट २०२२ मध्ये जाहीर झाला होता. त्यामुळे इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप, महाडिक गट आणि काँग्रेसने फिल्डिंग लावली होती, तर तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील यांची जयंत एक्स्प्रेस इच्छुक कार्यकर्त्यांनी फुल झाली होती. त्यानंतर शिवसेनेतील बंडाळीने महाविकास आघाडीला धक्का बसला. त्यामुळेच जयंत एक्स्प्रेसमधील काही डबे रिकामे झाल्याची चर्चा आहे.जनतेतून नगराध्यक्ष, सरपंचपद निवडीचा निर्णय झाला; परंतु नव्यानेच होणारी प्रभाग रचना आणि आरक्षण यावर अद्यापही निर्णय झाला नाही. त्यामुळे दोन्ही गटांतील इच्छुक उमेदवारांनी संपर्क कमी केला आहे, तर राष्ट्रवादीने प्रभाग वाईज बैठकीचे सत्र सुरूच ठेवले आहे. इच्छुक उमेदवारांकडून अर्जही मागविले आहेत. शंभरहून अधिक इच्छुकांनी राष्ट्रवादीकडे आपली नावे नोंदविली आहेत; परंतु जनतेतून नगराध्यक्ष निवडी होत असल्याने दोन्ही गटाकडे सक्षम नेतृत्व नसल्याचे स्पष्ट आहे.तरीसुद्धा राष्ट्रवादीतून माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, माजी नगराध्यक्ष ॲड. चिमण डांगे, माजी उपनगराध्यक्ष संजय कोरे आणि शहराध्यक्ष शहाजी पाटील हे आर्थिक सक्षमसह नगराध्यक्ष पदासाठी लढू शकतील, असा अंदाज राष्ट्रवादीतून व्यक्त केला जात आहे. तर विकास आघाडीतून शिवसेनेचे शिंदे गटाचे आनंदराव पवार आणि महाडिक गटाचे कपिल ओसवाल, विक्रम पाटील यांचे नाव पुढे येऊ शकते; परंतु महिला आरक्षण पडल्यास दोन्ही गटांना नेतृत्व उभा करणे तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूकislampur-acइस्लामपूर