कुपवाडच्या रुग्णालय निविदा प्रक्रियेस स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:28 IST2021-01-03T04:28:47+5:302021-01-03T04:28:47+5:30

सांगली : महापालिकेच्या वारणाली येथील प्रस्तावित जागेत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेला वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली. ...

Postponement of Kupwad hospital tender process | कुपवाडच्या रुग्णालय निविदा प्रक्रियेस स्थगिती

कुपवाडच्या रुग्णालय निविदा प्रक्रियेस स्थगिती

सांगली : महापालिकेच्या वारणाली येथील प्रस्तावित जागेत मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी सुरू केलेल्या निविदा प्रक्रियेला वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने स्थगिती दिली.

न्यायाधीश यशश्री मारुलकर यांनी हा निकाल दिला. आयुक्त नितीन कापडनीस यांनी २० ऑक्टोबर रोजी वारणाली येथील प्रस्तावित जागेत हॉस्पिटल उभारण्यासाठी निविदा मागिवल्या होत्या. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे ही प्रक्रिया थांबणार आहे. कुपवाड येथील हणमंत सरगर, बापूसो तोडकर, श्रीपाल कोल्हापुरे, योगेश हिंगमिरे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सचिन पाटील व अ‍ॅड. कोमल जाधव यांनी युक्तिवाद केला.

गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयाचा वाद सुरू आहे. एका गटाने मंंजूर असलेल्या जागेत म्हणजे वारणालीत रुग्णालय व्हावे, तर दुसऱ्या गटाने कुपवाडसाठी रुग्णालय असल्याने ते कुपवाडमध्येच सुचविलेल्या जागेत व्हावे, अशी मागणी केली होती.

वाद वाढल्याने तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी उपायुक्त स्मृती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. भाजपने वाघमोडेनगर येथे जागा नव्याने विकत घेऊन तेथे सर्वोपचार हॉस्पिटल उभारणीचा निर्णय घेतला होता. महासभेत तसा ठरावही केला होता. जागेचा वाद सुरू असतानाच आयुक्त कापडनीस यांनी हॉस्पिटलसाठी चार कोटी ४५ लाख ६१ हजार रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. यास नगरसेवक गजानन मगदूम यांच्यासह कुपवाड संघर्ष समितीने विरोध केला. त्यासाठी सर्व पक्षीय कृती समिती स्थापन करण्यात आली.

प्रशासन या मागणीला जुमानत नसल्याने दिवाणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याबाबत शनिवारी सुनावणी झाली. अ‍ॅड. सचिन पाटील म्हणाले, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत कुपवाडसाठी हे हॉस्पिटल मंजूर झाले होते. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, या हेतूने कुपवाडमध्येच हे हॉस्पिटल मंजूर करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने ते वारणालीसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये उभारण्याचा घाट घातला आहे. वारणालीत ज्या जागेवर हॉस्पिटल उभाणार आहे, त्या जागेच्या मूळ मालकाने जागा परत मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच जागेवर हॉस्पिटल बांधण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. हा कुपवाडवर अन्याय आहे, अशी बाजू मांडण्यात आली. अखेर न्यायालयाने या बाबी विचारात घेत वारणाली येथील हॉस्पिटलच्या निविदा प्रक्रियेस स्थगिती दिली.

Web Title: Postponement of Kupwad hospital tender process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.