बुर्ली येथे मरणोत्तर नेत्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:25 IST2021-09-13T04:25:33+5:302021-09-13T04:25:33+5:30

भिलवडी : बुर्ली (ता. पलूस) येथील कल्पना श्रीपाल खोत यांचे मरणोत्तर नेत्रदान भिलवडी जायंट्स ग्रुप आणि डॉ. दिलीप पटवर्धन ...

Posthumous eye donation at Burley | बुर्ली येथे मरणोत्तर नेत्रदान

बुर्ली येथे मरणोत्तर नेत्रदान

भिलवडी : बुर्ली (ता. पलूस) येथील कल्पना श्रीपाल खोत यांचे मरणोत्तर नेत्रदान भिलवडी जायंट्स ग्रुप आणि डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या नंदादीप हॉस्पिटलच्या सहकार्याने करण्यात आले. कल्पनाच्या आई विलासमती खोत, वडील श्रीपाल खोत व खोत कुटुंबीयांच्या पुढाकाराने बुर्ली गावात झालेले हे पहिले मरणोत्तर नेत्रदान आहे.

जायंट्स ग्रुपचे ज्येष्ठ पदाधिकारी उद्योगपती गिरीश चितळे आणि भिलवडी जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील परीट यांनी खोत कुटुंबीयांच्या या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

डॉ. जयकुमार चोपडे यांनी नेत्रदानाच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. या वेळी जायंट्सचे डी. आर. कदम, सुहास खोत, राजेंद्र कुलकर्णी, डॉ. राजेंद्र शेंडगे, रामचंद्र दीक्षित, डॉ. चंद्रशेखर माने, संतोष खोत, दीपक खोत, जी. के. शेख, संजय आंबी, संजय चौगुले आदी उपस्थित होते.

Web Title: Posthumous eye donation at Burley