शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Sangli: उरुण-ईश्वरपूर पालिकेत बहुरंगी लढतीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:31 IST

Local Body Election: जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती

युनूस शेखइस्लामपूर : ईश्वरपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा बिगुल वाजल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आचारसंहितेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्षासह विविध पथकांची नियुक्ती करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळची निवडणूक ही बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.गेल्या नऊ वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१६मध्ये पालिकेची निवडणूक झाली होती. त्या सभागृहाची मुदत २०२१मध्ये संपल्यानंतर जानेवारी २०२२पासून प्रशासकीय राजवटीचा कारभार सुरू झाला होता. त्यानंतर ३ वर्षे १० महिन्यांच्या कालावधीनंतर आता नव्या सभागृहासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.गेल्या निवडणुकीत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखालील गटाची ३१ वर्षांची सत्ता उलथवून टाकत विकास आघाडीच्या निशिकांत भोसले-पाटील यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारली होती. मात्र, प्रभागातील संख्या बळात अपक्षाची साथ घेत राष्ट्रवादीने सभागृहातील बहुमत आपल्याकडे राखले होते. त्यामुळे विविध विषय समित्यांच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक राहिले होते. विकास आघाडीचे १३ नगरसेवक, तर राष्ट्रवादीचे १४ नगरसेवक निवडून आले. एका जागी अपक्ष उमेदवाराने बाजी मारली होती.यावेळच्या निवडणुकीसाठी आ. जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विचारात न घेताच नगराध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या नावाची घोषणा करून खळबळ उडवून दिली होती. दुसरीकडे विकास आघाडी म्हणून की महायुती म्हणून लढायचे, अशा संभ्रमात असलेल्या गटाकडून अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. या गटाकडून माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे यांच्या नावावर एकमत झाल्याची चर्चा असली तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दुसरीकडे काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी चालवली असून, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचाही उमेदवार येण्याची शक्यता आहे. शहरातील इतर सामाजिक, पुरोगामी, परिवर्तनवादी आणि डाव्या विचारांना मानणाऱ्या गटांचीही निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत.मावळत्या सभागृहातील बलाबल

  • नगराध्यक्ष- विकास आघाडी - १
  • नगरसेवक - विकास आघाडी -१३
  • नगरसेवक- राष्ट्रवादी-१४
  • अपक्ष - १

एका प्रभागाची वाढयंदाच्या निवडणुकीत एका प्रभागाची वाढ होत ती १५ इतकी झाली आहे. या १५ प्रभागांतून ३० नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या मतदानासाठी ६४ हजार २१५ इतकी मतदार संख्या आहे. प्रभाग १५ हा सर्वाधिक ५,५९५ मतदार संख्येचा आहे. त्याखालोखाल प्रभाग क्र. २ हा ५,१९३ आणि प्रभाग क्र. ६ हा ५,०९७ मतदार संख्येचा आहे. प्रभाग क्रमांक ११ हा सर्वात कमी २,७४५ मतदार संख्येचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Multi-cornered fight likely in Urrun-Islampur municipal elections.

Web Summary : Urrun-Islampur municipal elections anticipate a multi-cornered contest. Political dynamics shift as parties announce candidates. Congress may contest independently. Election follows administrative rule after the previous council's term ended. Voters will elect 30 councilors from 15 wards.