शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
4
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
5
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
6
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
7
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
8
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
9
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
10
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
11
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
12
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
13
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
14
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
15
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
16
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
17
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
18
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
19
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
20
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!

उद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्रात ऊस पाठविण्यावर बंदीची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 6:03 PM

कर्नाटक सीमाभागात उन्हाळ्यातील टंचाई आणि नंतर महापूर, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ऊस उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. तसेच यंदाच्या गळीत हंगामात कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाकडून ऊस महाराष्ट्रात पाठविण्यावर बंदी आणण्याचे धोरण आखण्यात आले आहे. हे धोरण मोडीत काढण्यासाठी ऊस उत्पादक संघटित होऊन व्यापक लढा उभारण्याच्या पवित्र्यात आहेत.

ठळक मुद्देउद्दिष्टपूर्तीसाठी महाराष्ट्रात ऊस पाठविण्यावर बंदीची शक्यताऊस उत्पादक व्यापक लढा उभारण्याच्या पवित्र्यात

सचिन माने कागवाड : कर्नाटक सीमाभागात उन्हाळ्यातील टंचाई आणि नंतर महापूर, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे ऊस उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. तसेच यंदाच्या गळीत हंगामात कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाकडून ऊस महाराष्ट्रात पाठविण्यावर बंदी आणण्याचे धोरण आखण्यात आले आहे. हे धोरण मोडीत काढण्यासाठी ऊस उत्पादक संघटित होऊन व्यापक लढा उभारण्याच्या पवित्र्यात आहेत.अथणी, कागवाड, रायबाग, चिक्कोडीसह बेळगाव जिल्ह्यातील इतर तालुक्यातही प्रामुख्याने ऊसपीक घेतले जाते. या भागातही साखर कारखाने कार्यरत आहेत. मात्र कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानाच्या ऊस दरात प्रतिटन चारशे ते पाचशे रुपयांची मोठी तफावत आहे.

तसेच या भागातील पुरवठा केलेल्या उसास महाराष्ट्रातील कारखान्यांकडून साडेबारा ते तेरा टक्के रिकव्हरी लाभते, तर कर्नाटक सीमाभागातील कारखान्यांकडून याच उसास अकरा टक्के रिकव्हरी दाखविली जाते. त्यामुळे या तालुक्यातील लाखो टन ऊस महाराष्ट्र सीमाभागातील साखर कारखान्यांना पुरवठा होतो. या धर्तीवर कर्नाटक सीमाभागातील ऊस उत्पादकांची आर्थिक स्थिती सुधारण्यात महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा मोलाचा वाटा आहे.सीमाभागात ऐन उन्हाळ्यात नदी कोरडी पडल्याने पुरेशा पाण्याअभावी ऊस पिकाची वाढ खुंटली, तर पावसाळ्यात महापुराने नदीकाठचा हजारो हेक्टर ऊस उद्ध्वस्त झाला. यामुळे कारखान्यांना आपले गाळप उद्दिष्ट गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. यासाठी कर्नाटकमधून अशाप्रकारची बंदी आणण्याची तयारी सुरू आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेSangliसांगली