कोकरुड-पाचवड फाटा मार्गाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST2020-12-11T04:53:22+5:302020-12-11T04:53:22+5:30

एक वर्षापूर्वी डीएचडी कंपनीने पाचवड फाटा ते कोकरुड या रस्त्याच्या रुंदीकरणास सुरुवात केली. मात्र कोरोनामुळे हे काम ठप्प होते. ...

Poor condition of Kokrud-Pachwad fork road | कोकरुड-पाचवड फाटा मार्गाची दुरवस्था

कोकरुड-पाचवड फाटा मार्गाची दुरवस्था

एक वर्षापूर्वी डीएचडी कंपनीने पाचवड फाटा ते कोकरुड या रस्त्याच्या रुंदीकरणास सुरुवात केली. मात्र कोरोनामुळे हे काम ठप्प होते. सध्या कामास पुन्हा सुरुवात झाली आहे. घोगावपर्यंत (कऱ्हाड) काम पूर्ण झाले आहे. शिराळा तालुक्यात रुंदीकरणाच्या कामास सुरुवात झाली असून, अनेक लहान-मोठे चढ़ काढण्यात येत आहेत. मात्र दुरुस्ती करतेवेळी जागोजागी रस्त्यात लहान-मोठे दगड ठेवले आहेत. रस्त्यावर पाण्याचा वापर योग्य वेळेत होत नसल्याने धुळीचे कण नाक आणि डोळ्यात जात असल्याने आजार वाढत आहेत.

जिथे काम सुरू आहे अशा ठिकाणी फलक नसल्याने अनेक वाहने अडकून पडत आहेत. आटुगडेवाडी खिंडीपासून कोकरूडपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. येथून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या रस्त्याच्या रूंदीकरणासाठी साईटपट्टीचे खोदकाम चालू आहे.

काही ठिकाणी गटारी व रस्त्याकडेची झाडे तोडण्यापलीकडे रस्त्यावरील एकही खड्डा मुजवला गेला नाही. अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्तीमुळे दिशादर्शक फलक गायब झाल्याने या मार्गावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास होत असल्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

चाैकट

फलक असता तर...

शेडगेवाडी येथे काम सुरू असल्याचा फलक नसल्याने उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकास अंदाज न आल्याने भरलेला ट्रक पलटी झाला; मात्र जीवितहानी झाली नाही. फलक नसल्याने याठिकाणी अनेक अपघात झाले आहेत.

फोटो-१०कोकरुड०१

Web Title: Poor condition of Kokrud-Pachwad fork road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.