डफळापूर-बाज रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:30 IST2021-08-12T04:30:32+5:302021-08-12T04:30:32+5:30

जत : जत तालुक्यातील पश्चिम भागातील बाजारपेठेचे प्रमुख ठिकाण असणारे डफळापूर ते बाज हा रस्ता गेल्या काही महिन्यांत नव्याने ...

Poor condition of Dhalapur-Baj road | डफळापूर-बाज रस्त्याची दुरवस्था

डफळापूर-बाज रस्त्याची दुरवस्था

जत : जत तालुक्यातील पश्चिम भागातील बाजारपेठेचे प्रमुख ठिकाण असणारे डफळापूर ते बाज हा रस्ता गेल्या काही महिन्यांत नव्याने केला होता. या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे, असा आरोप आरपीआयचे आठवले गट जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, रस्त्याचे काम निकृष्ट झाल्यामुळे त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याला मोठाल्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून दुचाकी व चार चाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता ताबडतोब दुरुस्त करावा; अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंचे मातंग आघाडी तालुकाध्यक्ष दुर्गापा ऐवाळे, संभाजी ऐवाळे, पिराजी ऐवाळे यांना सोबत घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीबाबत संबंधित विभागाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही साबळे यांनी दिला आहे.

Web Title: Poor condition of Dhalapur-Baj road