शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: विश्वास साखर कारखान्यास प्रदूषण मंडळाची नोटीस, प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 18:48 IST

वारणा नदी प्रदूषण प्रश्नी निर्देश 

सांगली : चिखली (ता. शिराळा) येथील विश्वास साखर कारखान्यातून सोडल्या गेलेल्या मळीमिश्रित सांडपाण्याने वारणा नदीचे प्रदूषण वाढल्याची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. त्याची दखल घेत मंडळाने कारखान्यास नोटीस दिली असून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत दिली आहे.स्वतंत्र भारत पक्षाचे संस्थापक सुनील फराटे यांनी याबाबतची तक्रार प्रदूषण मंडळाकडे केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याच्या साखर व डिस्टिलरी युनिट मधून मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडले जात आहे. हे सांडपाणी एका नाल्यात सोडले जात असून हा नाला पुढे जाऊन वारणा नदीत मिसळतो. त्यामुळे वारणा नदीपात्र प्रदूषित होत आहे. नागरिकांच्या तसेच येथील जलचरांच्या आरोग्यावर याचा वाईट परिणाम होत आहे. प्रदूषणाबाबत येथील नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, तरीही त्या सोडविण्यासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाहीत.

मंडळाच्या सांगलीतील उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी १७ डिसेंबर २०२४ रोजी कारखान्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आदेशाचे पालन न केल्याने कोल्हापूरच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आता या उद्योगाला प्रक्रिया प्रकल्पाच्या दुरुस्तीचे निर्देश दिले आहेत.

ताबडतोब उपाय करण्याचे निर्देशमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर विभागीय अधिकारी जे.एस. हजारे यांनी कारखान्याला तातडीने ईटीपीमध्ये दुरुस्ती तसेच प्रक्रिया न केलेले सांडपाणी नाल्यात जाण्यापासून रोखण्याचे निर्देश दिले आहेत.

विश्वास कारखान्याकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकाप्रमाणेच स्पेंट वॉशची संपूर्ण प्रक्रिया होते. ईटीपी सुद्धा व्यवस्थित कार्यान्वित असतो. सध्या कारखाना बंद होऊन पंधरा दिवस झाले आहेत. यापूर्वीही कारखान्याचे कोणतेही सांडपाणी कुठेही नैसर्गिक स्रोतात सोडलेले नाही. मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबतची प्रत्यक्ष माहिती आम्ही दिलेली आहे. कारखान्याबाबत अकारण गैरसमज पसरवला जात आहे. - अमोल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, विश्वास सहकारी साखर कारखाना, चिखली (ता. शिराळा)

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेpollutionप्रदूषण