शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

८२ ग्रामपंचायतींसाठी २७ मे रोजी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:27 AM

सांगली : जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार २७ मे रोजी मतदान होणार असून, जिल्ह्यातील ४० ठिकाणच्या पोटनिवडणुकाही याच कालावधीत पार पडणार आहेत.शिराळा तालुक्यातील सर्वाधिक २७, आटपाडीतील २०, तर कवठेमहांकाळच्या १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.यात जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गावांचा समावेश असून, थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमुळे ...

सांगली : जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम सोमवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने जाहीर केला. त्यानुसार २७ मे रोजी मतदान होणार असून, जिल्ह्यातील ४० ठिकाणच्या पोटनिवडणुकाही याच कालावधीत पार पडणार आहेत.शिराळा तालुक्यातील सर्वाधिक २७, आटपाडीतील २०, तर कवठेमहांकाळच्या १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार आहेत.यात जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गावांचा समावेश असून, थेट सरपंचपदाच्या निवडणुकीमुळे चुरस वाढणार आहे.जून २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधित मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून, त्यात जिल्ह्यातील ८२ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होणार असल्याने हवामानाबरोबरच गावचे राजकीय वातावरणही चांगलेच तापणार आहे.निवडणुका होणारी गावे तालुकानिहाय पुढीलप्रमाणे : मिरज- कावजी खोतवाडी, निलजी बामणी, वाजेगाव. कवठेमहांकाळ - बसाप्पाचीवाडी, दुधेभावी, गर्जेवाडी, करलहट्टी, पिंपळवाडी, रामपूरवाडी, देशिंग, अग्रण धुळगाव, घोरपडी, करोली (टी), कोकळे, शिंदेवाडी, ढोलेवाडी, ढालगाव, कदमवाडी, कुंडलापूर, मोरगाव, जाधववाडी, झुरेवाडी. जत - गुलगुंजनाळ, कों. बोबलाद, कोणबगी, बिळूर, खिलारवाडी. खानापूर - देवनगर, भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे. आटपाडी - नेलकरंजी, वाकसेवाडी, काळेवाडी, मानेवाडी, मासाळवाडी, मिटकी, पिंपरी खुर्द, आंबेवाडी, खांजोडवाडी, आटपाडी, बनपुरी, भिंगेवाडी, करगणी, मापटेमळा, मुढेवाडी, निंबवडे, पूजारवाडी, विभूतवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी. पलूस - आमणापूर, विठ्ठलवाडी. कडेगाव - वाजेगाव, चिंचणी, वांगी. शिराळा - वाकुर्डे बु, भाटशिरगाव, धसवाडी, करूंगली, मादळगाव, खुजगाव, रांजणवाडी, रिळे, शिरशी, आंबेवाडी, बेलेवाडी, फकीरवाडी, खराळे, कुसाईवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, चिखलवाडी, अस्वलेवाडी, चिंचेवाडी, इंग्रुळ, कुसळेवाडी, मराठेवाडी, मेणी, मोरेवाडी, पणुंब्रे तर्फ वारुण, पाचगणी, मानेवाडी.४० गावांत पोटनिवडणूक८२ गावांच्या ग्रामपंचायतींबरोबरच ९ गावांतील सरपंच पदांसाठी व ७२ सदस्य पदांसाठी पोटनिवडणुकाही होत आहेत. ४० गावांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये मिरज तालुक्यातील ९ सदस्य, २ सरपंच, तासगावमधील ६ सदस्य, जतमधील २४ सदस्य, १ सरपंचपद, आटपाडीतील ३ सदस्य, विट्यातील ८ सदस्य, कडेगावात ४ सदस्य १ सरपंच, पलूसमध्ये ४ सदस्य, १ सरपंच, वाळवा येथे ७ सदस्य, ३ सरपंच, शिराळा येथे ८ सदस्य व एका सरपंच पदासाठी पोटनिवडणूक होणार आहे.नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचीदिनांक ७ मे ते १२ मेउमेदवारी अर्जांचीछाननी १४ मेउमेदवारी अर्ज माघारी घेण्याची दि. १६ मेनिवडणूक चिन्हांचे वाटप १६ मेमतदान २७ मे (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)मतमोजणी २८ मे