शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत फळ मार्केटला पोलिसांनी लावली शिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 13:19 IST

फळ मार्केटमध्ये प्रवेश देताना विक्रेत्याकडील ओळखपत्राची शहानिशा केली जात होती. किरकोळ पेटी, दोन पेटी आंबा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना फळ मार्केटमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे गुरुवारी फळ मार्केटमध्ये होलसेल विक्रेत्याव्यतिरिक्त फारशी गर्दी दिसत नव्हती.

ठळक मुद्देदुकानासमोर बॅरिकेटस् : किरकोळ ग्राहकांना प्रवेशबंदी

सांगली : संचारबंदीत विष्णू अण्णा फळमार्केटमध्ये खरेदीसाठी लोकांच्या होणाऱ्या गर्दीला आवर घालून सोशल डिस्टन्सिंगचा पालन करण्यासाठी पोलिस प्रशासनाने गुरुवारी ठोस पावले उचलली. फळ व्यापाºयाच्या दुकानासमोर बॅरिकेटस् लावून सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्यास भाग पाडले. किरकोळ फळ खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही प्रवेश नाकारत गर्दी टाळली. त्यामुळे फळ मार्केटला चांगली शिस्त लागली होती.फळ मार्केटमध्ये सध्या आंब्यांचा हंगाम जोरात सुरू आहे. सकाळी आठपासूनच फळ मार्केटमध्ये गर्दी असते. त्यात किरकोळ ग्राहकासोबतच होलसेल विक्रेत्यांचा समावेश असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केल्यानंतरही फळ मार्केटमधील गर्दी कमी झालेली नव्हती. त्यात लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नव्हते. काही दिवसांपूर्वी गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला होता. त्यानंतरही लोकांची गर्दी कायम राहिल्याने बुधवारी फळांचे सौदे एका मंगल कार्यालयाच्या मोकळ्या मैदानात काढण्यात आले. पण ही जागाही अपुरी पडू लागली. त्यानंतर पोलिस उपअधिक्षक अशोक वीरकर, सांगली शहरचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्याशी व्यापाऱ्यांनी चर्चा करून पुन्हा फळ मार्केटमध्येच सौदे काढण्यास परवानगी देण्याची विनंती केली. त्यावर पोलिसांनी सुरक्षित अंतराची मर्यादा पाळण्याची सक्त सूचना करण्यात आली. बाजार समिती, फळ व्यापारी व पोलिसांच्या सहकार्याने प्रत्येक दुकानासमोर बॅरिकेटस् लावण्यात आले. सुरक्षित अंतर ठेवून फळांचा सौदा काढण्यात आला.

फळ मार्केटमध्ये प्रवेश देताना विक्रेत्याकडील ओळखपत्राची शहानिशा केली जात होती. किरकोळ पेटी, दोन पेटी आंबा खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना फळ मार्केटमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे गुरुवारी फळ मार्केटमध्ये होलसेल विक्रेत्याव्यतिरिक्त फारशी गर्दी दिसत नव्हती. त्यातच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचेही कठोर पालन केले जात होते. मास्क न वापरणाºयावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पोलिसांनी घेतलेल्या पुढाकारामुळे महिन्यानंतर फळ मार्केटला चांगली शिस्त लागली होती.

टॅग्स :SangliसांगलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarket Yardमार्केट यार्ड