शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Police Commemoration Day : 'देशासाठी लढताना शहीद झालेले पोलीस नेहमीच स्मरणात राहतील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 14:25 IST

पोलिसांमुळेच समाजाला आजही सुरक्षिततेची भावना वाटते. समाजात शांतता तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने पोलिसच करीत आहेत.

सांगली - पोलिसांमुळेच समाजाला आजही सुरक्षिततेची भावना वाटते. समाजात शांतता तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने पोलिसच करीत आहेत. देशासाठी लढताना प्राणांची आहूती दिलेले शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी नेहमीच स्मरणात राहतील, असे मत जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी व्यक्त केले. 

जिल्हा पोलीस दलातर्फे रविवारी सकाळी विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयात शहीद पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काळम-पाटील बोलत होते. ते म्हणाले, देशाच्या सीमेवर संरक्षण करताना शहीद होणाऱ्या पोलिसांची संख्या वाढत आहे. जम्मू-काश्मीरमध्येही पोलिसांवरील हल्ले वाढत आहेत. अन्यत्र ठिकाणीही पोलिसांना टार्गेट करुन हल्ले केले जात आहे. पोलिसांवरील वाढते हल्ले,  ही चिंताजनक बाब आहे. पोलीस आपल्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे, असे विसरुन चालणार नाही. 

यावेळी नांदेड परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, महापालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक विरकर, अनिकेत भारती, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. देशभरातील एकूण ४१६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

लडाख येथे २१ आॅक्टोबर १९५९ रोजी देशाचे संरक्षण करणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा पोलीस शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराने हल्ला केला होता. या तुकडीने त्याच्याशी लढा देताना प्राणांची आहुती दिली होती. तेंव्हापासून २१ आॅक्टोंबर हा दिवस शहिर पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. 

फैरी झाडून मानवंदना

परेड सलामी शस्त्र व शोक शस्त्र करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. देशासाठी शहीद झालेल्या अधिकारी, पोलिस कर्मचाऱ्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली.

टॅग्स :Police Commemoration Dayपोलीस हुतात्मा दिनSangliसांगलीPoliceपोलिस