शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

जमीन नांगरून घेतली पूजनास माती

By admin | Updated: December 22, 2016 23:36 IST

सदाभाऊंचा उपक्रम : शिवरायांच्या पुतळ्याच्या चरणी अर्पण करणार

रेठरेधरण : मुंबई येथे अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामास सुरुवात होत आहे. यासाठी रेठरेधरण (ता. वाळवा) येथील शेतातून मातीचा कलश घेऊन जाण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.सदाभाऊ खोत यांनी रेठरेधरण या त्यांच्या मायभूमीतून विश्वास दत्तात्रय धुमाळ यांच्या शेतात आठ-दहा बैल नांगराला जुंपून, तो नांगर हाकून जमिनीतून निघालेली माती शिवरायांच्या पुतळ्याच्या चरणी अर्पण करण्यासाठी कलशामध्ये भरुन घेतली. रेठरेधरण-शिराळा रस्त्याशेजारील शेतामध्ये सकाळी दहा वाजता पाठीवर झूल टाकून सजविलेल्या आठ बैलजोड्या आल्या. त्यांच्या स्वागतासाठी धनगरी ढोल व पेठ येथील गोंधळी यांनी गोंधळ घालून कार्यक्रमाला शोभा आणली. या कार्यक्रमाचे नियोजन ज्योतिर्लिंग महिला दूध संघाचे मार्गदर्शक दिलीप पाटील यांनी केले. यावेळी तहसीलदार सविता लष्करे, कृषी अधिकारी एस. एम. पठाण, दिलीप पाटील, विश्वास धुमाळ, चंद्रकांत पाटील, दादासाहेब राऊत, संजय घोरपडे, संदीप खोत, जयकर कचरे, भूषण पाटील, शशिकांत पाटील, प्रशांत पाटील, पांडुरंग पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)