शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसित गावठाणमधील भूखंड वर्ग एक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:23 IST

फोटो ओळ : कडेगाव येथे सागरेश्वर सूतगिरणी कार्यस्थळावर प्रांताधिकारी आयुषी सिंह यांनी पुनर्वसित ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी अध्यक्ष शांताराम ...

फोटो ओळ : कडेगाव येथे सागरेश्वर सूतगिरणी कार्यस्थळावर प्रांताधिकारी आयुषी सिंह यांनी पुनर्वसित ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी अध्यक्ष शांताराम कदम, महेश कदम, संभाजी मुळीक उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावठाणमध्ये भोगवटदार वर्ग दोनचे वाटप झालेले भूखंड वर्ग एकमध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत. कडेगाव तालुक्यात बहुतांशी सर्व पुनर्वसित गावात ही प्रक्रिया बाकी आहे. यामुळे संबधित भूखंडधारकांनी आपले भूखंड वर्ग एक करून घ्यावेत, असे आवाहन कडेगावच्या प्रांताधिकारी आयुषी सिंह यांनी केले.

कडेगावच्या नूतन प्रांताधिकारी आयुषी सिंह यांनी कडेगाव येथील सागरेश्वर सहकारी सूत गिरणीला भेट दिली. यावेळी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी तालुक्यातील मेंढगाव, वांग रेठरे, वाजेगाव, घोटील, नांदनी नगर, उमर कांचन, केकताई नगर या पुनर्वसित गावातील लोकांचे प्रश्न मांडले. यावेळी संबंधित गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

आयुषी सिंह म्हणाल्या, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करताना पुनर्वसित गावठाणमध्ये घर बांधण्यासाठी त्यांनी यापूर्वी धारण केलेल्या जमिनीच्या भोगवटा स्थितीसह भूखंड मंजूर करण्यात येतो. पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना पुनर्वसित झालेल्या गावठाणमध्ये भोगवाटदार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचा शासन निर्णय आहे. ही प्रक्रिया सुरू असून, अत्यंत अल्प मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना त्यांचे भूखंड वर्ग एक करून देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपले अर्ज द्यावेत, त्यावर तत्काळ कार्यवाही होईल, असे सिंह यांनी सांगितले.

शांताराम कदम म्हणाले, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे पुनर्वसित गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मूलभूत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहेत. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे उपाध्यक्ष महेश कदम व संभाजी मुळीक उपस्थित होते.