शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

सांगलीत जिल्हा परिषदेत पोषण आहारातून आणला प्लास्टिकचा साप, दलित महासंघाचे आंदोलन

By संतोष भिसे | Updated: July 5, 2024 17:10 IST

पलूसमध्ये अंगणवाडीतील आहारात साप सापडल्याचा निषेध

सांगली : पलूस येथे अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मृत साप सापडल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाने शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर घोषणाबाजी केली. पुरवठादार संस्थेची चौकशी करुन ठेका रद्द करावा आणि संबंधित अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी केली.महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तमराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या प्रवेशदारात आंदोलन झाले. आंदोलकांनी पोषण आहाराचे धान्य आणि त्यामध्ये प्लास्टिकचा साप आणला होता. पोलिसांनी आंदोलकांना प्रवेशदारातच अडविले. एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले.महासंघाने निवेदनात म्हटले आहे की, पलूस येथे कृषिनगर अंगणवाडीत पोषण आहारात मृत साप सापडणे ही गंभीर बाब आहे. बालकांच्या आरोग्याविषयी शासन किती बेफिकिर आहे हे यातून स्पष्ट होते. इतकी गंभीर घटना घडूनही अधिकारी कारवाईच्या मनस्थितीत दिसत नाहीत. त्यामुळे शासनाने स्वतंत्र चौकशी समितीद्वारे सखोल चौकशी करावी. पुरवठादाराचा ठेका रद्द करावा. या घटनेकडे दुर्लक्ष करुन बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे.आंदोलनात राज्याध्यक्ष टिपू पटवेगार, राज्य संपर्क प्रमुख गणेश वाईकर, महिला अध्यक्षा वनिता कांबळे, सनाऊला बावचकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सलीम मुल्ला, तात्यासाहेब देवकुळे, महेश देवकुळे, सचिन मोरे आदी सहभागी झाले.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषदagitationआंदोलन