जतमध्ये आरपीआयकडून रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:18 IST2021-07-21T04:18:41+5:302021-07-21T04:18:41+5:30
जत : जत शहरातील संभाजी चौक ते शिवाजी पेठ हा रस्ता खड्डेमय झाल्याने तो दुरुस्त करण्याची मागणी करूनही ...

जतमध्ये आरपीआयकडून रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण
जत : जत शहरातील संभाजी चौक ते शिवाजी पेठ हा रस्ता खड्डेमय झाल्याने तो दुरुस्त करण्याची मागणी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मंगळवारी रस्त्यावर वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष संजय कांबळे व उपाध्यक्ष विकास साबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. जत शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. मधोमध मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या खड्ड्यात पाणी जाऊन अपघात होत आहेत. डाॅ. आरळी हाॅस्पिटल ते छत्रपती संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोलीस ठाणे या रस्त्यांवर, तसेच छत्रपती संभाजी चौक ते शहीद सोलनकर चौक या रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे यंत्रणेने त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी केली आहे. संभाजी चौक ते शिवाजी चौक या रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण केले. त्वरित रस्ते दुरुस्त न केल्यास जत शहर बंद, चक्काजाम आंदोलन व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा अशी आंदोलने केली जातील, असा इशारा संजय कांबळे यांनी दिला.
यावेळी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. हेमंत चौगुले, किशोर चव्हाण, विनोद कांबळे, सुभाष कांबळे, प्रशांत ऐदाळे, राहुल चंदनशिवे, किशोर चव्हाण, सोमनाथ कांबळे उपस्थित होते.
200721\img-20210720-wa0065.jpg
जतमध्ये रिपब्लिकन पक्षाच्यावतीने रस्त्यावरील खड्डयात केले वृक्षारोपण