पाईपलाईनद्वारेच शेतीला पाणी हव
By Admin | Updated: July 27, 2014 23:59 IST2014-07-27T23:41:11+5:302014-07-27T23:59:00+5:30
डोंगरवाडी संघर्ष समिती : मतदानावरील बहिष्कार कायमे

पाईपलाईनद्वारेच शेतीला पाणी हव
सोनी : वन विभागाच्या जमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी, अजून अनेक अडथळे पार करावे लागणार आहेत. आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांनी डोंगरवाडी योजनेचे उद्घाटन करून या भागाला आशेवरच ठेवले आहे. त्यामुळे आम्हाला उद्घाटनाच्या नारळातील पाणी नको, तर कालव्याचे पाणी पाईपलाईनमधून शेतकऱ्यांच्या शेतात आलेले पहायचे आहे, असे मत या संघर्ष समितीचे समन्वयक अरविंद पाटील यांनी व्यक्त केले.
पाटील म्हणाले की, सोनीसह परिसराला म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजनेतून पाणी मिळावे यासाठी गेल्या महिन्याभरापासून डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेच्या संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने या योजनेच्या कामाला गती येऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वनजमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे व त्या ठिकाणी काम चालू करून पाणी देण्यातील अडचण सुटली आहे. पण या एकाच समस्येनंतर शेतकऱ्यांना पाणी मिळाले असे नसून पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेपर्यंत हा आमचा लढा चालूच राहणार असून तोपर्यंत मतदानावर बहिष्काराचा निर्धार कायम असणार आहे व त्यासाठी ही संघर्ष समिती लढा देतच राहणार आहे.
आतापर्यंत अनेक नेत्यांनी या योजनेचे नारळ फोडले असून अवघ्या सहा महिन्यात पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण याला आज १५ वर्षे लोटली तरी पाणी मिळाले नसल्याने, नेत्यांच्या आश्वासनाला आम्ही बळी न पडता पाणी मिळेपर्यंत हा लढा चालूच ठेवणार आहे, असे मत यावेळी अरविंद पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी सतीश जाधव, चंपाताई जाधव, रमेश कदम, उल्हास माळकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
पाणी बांधापर्यंत पोहोचेपर्यंत लढा
मागील महिन्याभरापासून डोंगरवाडी उपसासिंचन योजनेच्या संघर्ष समितीने मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याने या योजनेच्या कामाला गती येऊन अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वनजमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्या ठिकाणी काम चालू करून पाणी देण्याची समस्या सुटली आहे. पण या एकाच समस्येच्या सोडवणुकीनंतर शेतकऱ्यांना पाणी मिळाले असे नसून, पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचेपर्यंत हा आमचा लढा सुरु राहणार असून तोपर्यंत मतदानावर बहिष्काराचा निर्धार कायम असणार आहे, असा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला आहे.