सांगली शहरामध्ये खांबांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:36+5:302020-12-13T04:40:36+5:30

माधवनगरमध्ये औषध फवारणीची मागणी सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील गटारींची अवस्था बिकट आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. ...

Pillar obstruction in Sangli city | सांगली शहरामध्ये खांबांचा अडथळा

सांगली शहरामध्ये खांबांचा अडथळा

माधवनगरमध्ये औषध फवारणीची मागणी

सांगली : माधवनगर (ता. मिरज) येथील गटारींची अवस्था बिकट आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. गटारींची नियमितपणे स्वच्छता करावी, तसेच डास निर्मूलन औषधांची फवारणी करावी, अशी नागरिकांतून मागणी आहे आहे.

नाल्यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी

सांगली : महापालिका क्षेत्रातील सर्व नैसर्गिक नाल्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. या नाल्यांचे महापालिका प्रशासनाने शोध घेण्याची गरज आहे. अनेक बिल्डरकडून या नाल्यावर अतिक्रमणे केली जात आहेत. महापालिकेनेच अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.

बसस्थानक परिसराला अतिक्रमणाचा विळखा

सांगली : येथील मुख्य बसस्थानक परिसर अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला आहे. परिसरातील टपरीधारक, रिक्षाचालकांच्या गर्दीतून वाट काढताना प्रवाशांची दमछाक होते. अतिक्रमणे हटवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

Web Title: Pillar obstruction in Sangli city