शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

पिक्चर अभी बाकी है! : प्रतीक पाटील,, जयंतरावांच्या विरोधकांना टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:51 PM

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अनेक नेते आक्रमक होऊ लागले आहेत. त्यांना शह देण्यासाठी आ. पाटील यांनी दोन्ही मुलांना राजारामबापू उद्योग

अशोक पाटील।इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अनेक नेते आक्रमक होऊ लागले आहेत. त्यांना शह देण्यासाठी आ. पाटील यांनी दोन्ही मुलांना राजारामबापू उद्योग समूहाच्या माध्यमातून राजकीय पटलावर उतरवले आहे. इस्लामपूर येथे सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात जयंतरावांचे पुत्र प्रतीक पाटील यांनी, ‘ये तो ट्रेलर है... पिक्चर अभी बाकी है’ असे सांगत विरोधकांना आव्हान दिले.

विधानसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी असतानाच तालुक्यातील अनेकांनी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, व्यंकटेश्वरा शिक्षण संकुलाचे सचिव राहुल महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचा समावेश आहे. याची जाहिरातबाजी सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात केली जात आहे. ‘आता थांबायचं नाही... आता काहीही झालं तरी लढायचं...’ अशा घोषणा व्हायरल झाल्या आहेत. काहींनी तर आमदार होण्यापूर्वीच पाठीमागील बाजूस विधानभवन असलेली स्वत:ची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे.

याला शह देण्यासाठी आमदार जयंत पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांना इस्लामपूर मतदारसंघात सक्रिय केले आहे. येथील राजारामबापू नाट्यगृहात आयोजित नृत्य शिबिराच्या समारोप कार्यक्रमात जयंतरावांचे पुत्र प्रतीक पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास युवकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. ती पाहून प्रतीक यांनी स्वत:चा जीवनप्रवास येथे उलगडला. परंतु जाता-जाता त्यांनी राजकीय शेरेबाजी केलीच. आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात जे सक्रिय आहेत, त्यांना प्रतीक यांनी टोला मारला की, ‘ये तो ट्रेलर है... पिक्चर अभी बाकी है...’ यातून आगामी प्रचाराच्या जबाबदारीची चुणूकही त्यांनी दाखवली. 

मी केलेले वक्तव्य राजकीय नाही. नृत्याचा कार्यक्रम होता, यामुळेच मी ‘फिल्मी स्टाईल’मध्ये युवकांसमोर बोललो. आमदार जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार आमचे बंधू राजवर्धन आहेत.- प्रतीक पाटील, युवा नेते, इस्लामपूर.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली