शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

पिक्चर अभी बाकी है! -- कारण राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 00:11 IST

तो बहुचर्चित पिक्चर सुरू झाला. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांची नावंही येऊन गेली.. म्हणजे पाट्या पडल्या हो! सुरुवात अगदीच रटाळ. वळणावळणानं स्टोरी पुढं जाऊ लागली. संथ गतीनं.

श्रीनिवास नागेतो बहुचर्चित पिक्चर सुरू झाला. पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या कलाकारांची नावंही येऊन गेली.. म्हणजे पाट्या पडल्या हो! सुरुवात अगदीच रटाळ. वळणावळणानं स्टोरी पुढं जाऊ लागली. संथ गतीनं. कारण पडद्यामागच्या कलाकारांनी केवळ आपापलं डिपार्टमेंट सांभाळायचं काम केलंय. एकसंध काम दिसतं नाही. टीमवर्क नाही. मध्यंतर आलं, तेव्हा कुठं एकेकाचं काम नजरेला येऊ लागलं. त्यातच मध्यंतर कधी झालं कळलंच नाही. पडद्यामागची मंडळी निर्माता-दिग्दर्शकासकट पुढं आली. मध्यंतरानंतरही कोण हिरो, कोण साईडहिरो आणि कोण व्हिलन हेच कळेना! आता तर पिक्चर शेवटाकडं चाललाय...

हीच गत महापालिका निवडणुकीची. इथं कमळवाल्यांचा पिक्चर चालण्याआधीच पाडायचा म्हणून यंदा हातावर घड्याळ बांधून आघाडीचा पिक्चर काढण्याची पक्की तयारी झाली होती, पण कमळाकडं जाणारे भुंगेकलाकार रोखण्यासाठी बेबनावाचं नाटक सुरू होतं. कारण कमळवाल्यांनी हातवाल्या-घड्याळवाल्या भुंग्यांना भुलवणं सुरू केलं होतं. कमळवाल्यांचं सगळं फुलणं, महापालिकेत झुलणं आणि पिक्चर चालणं बाहेरून आलेल्यांवरच अवलंबून होतं. त्यात त्यांना थोडं यश आलंही. हातवाल्यांचे मोठे कलाकार तिकडं गेले. त्यातल्या अनेकांना रोल मिळाला.

त्याचवेळी घड्याळवाले साहेब मात्र सजग झाले. पहिल्यांदा त्यांनी आपल्यातली मारामारी थांबवली. मग त्यांचे कमलाकरही ‘हमारा बजाज’चं गाणं सुरात सूर मिसळून म्हणू लागले. नंतर साहेब प्रदेशाध्यक्ष झाले आणि त्यांनी कमळाकडं जाणारं ‘आऊटगोर्इंग’ पद्धतशीर थांबवलं. हातावर घड्याळ बांधण्याच्या मिनत्या सुरू केल्या. कुपवाडकर धनपालतात्या आणि मिरजेच्या इद्रिसभार्इंना पटवलं. तात्या तर थेट कमळाकडून परत आले. तिथंच साहेबांनी कुपवाड आणि मिरजेत घड्याळाचा गजर मोठ्ठ्यानं करण्याची आणि पिक्चर जोरात चालवण्याची किल्ली दिल्याचं स्पष्ट झालं. त्यांच्या पिक्चरचे कथा-पटकथाकार, निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, कॅमेरामन, संकलक सबकुछ तेच! त्यांनी कलाकारांची निवडही खुबीनं केली. सगळी तगडी स्टारकास्ट. गर्दी खेचणारी. पंचवीस आठवडे हाऊसफुल्लचा बोर्ड हलणार नाही, याची शंभर टक्के खात्री!

मदनभाऊ आणि सोनसळच्या साहेबांचं अकाली जाणं हातवाल्यांसाठी सैरभैर करून गेलं. त्यामुळं खमक्या आणि एकमुखी डायरेक्टरअभावी त्यांचा चित्रपट रखडत होता. मग सामूहिक निर्मिती आणि दिग्दर्शनाची टूम निघाली. चार-पाच निर्माते आणि चार-पाच दिग्दर्शक! आधीच अनेक कलाकार सोडून गेलेले, त्यात मानधन आणि रोल मिळणार की नाही, याची खात्री नसल्यानं काहीजण मागं सरले. प्रत्येक दिग्दर्शकामध्ये आपापले कलाकार घुसवण्याची शर्यत लागलेली. शेवटी स्टारकास्ट ठरली. पण पिक्चरमध्ये न घेतल्यानं काही मातब्बर फुटले आणि त्यांनी दुसरा पिक्चर काढायचं ठरवलं. समांतर! (खरं तर त्यांना हातवाल्यांमधल्याच काही निर्मात्यांनी प्रोड्यूस केलेलं. पैसा दिला म्हणे!)

राजकारणातल्या फिल्म इंडस्ट्रीचा रागरंग बघून सरतेशेवटी हातवाले-घड्याळवाले यांनी एकत्र पिक्चर लावायचा ठरवलं. बैठका झाल्या. हातवाल्यांनी आपले कलाकार जास्त असतील, असं ठासून सांगितलं. साहेब लई हुश्शार! त्यांनी मान्य केलं, पण लिडींग रोल आपल्याच हातात ठेवले. हातवाल्यांपेक्षा आपली स्टारकास्ट कशी उठून दिसेल, भाव कशी खाईल, याची काळजी घेतली. खरं तर त्यांनी सरळसरळ गंडवलं, हे हातवाल्यांना कळलंच नाही. त्यांना वाटलं, आपले जास्त कलाकार, म्हणजे सबंध पिक्चर आपलाच! पण तसं नव्हतंच.कमळवाल्यांकडं निर्माता-दिग्दर्शक ठरलेला होता, चंद्रकांतदादा कोल्हापूरकर! त्यांनी सुभाषबापू सोलापूरकर, सुधीरदादा सांगलीकर, सुरेशभाऊ आणि मकरंदभाऊ मिरजकर यांना साथीला घेतलं.

अखेरच्या टप्प्यात कास्टिंग डायरेक्टर म्हणून संजयकाकाही आले. कलाकार फायनल करताना काकांचा रोल महत्त्वाचा ठरला. शेवटच्या टप्प्यात ‘इनकमिंग’ कमी झाल्यानं जरा गडबड झालीच. त्यांचं शुटिंग लवकर सुरु झालं. शुटिंगआधीच प्रसिद्धी जोमात झाली. हातवाले-घड्याळवाले कलाकारांची जुळवाजुळव करत असताना कमळवाल्यांचं निम्मं शुटिंग झालं होतं. सगळं कसं नियोजनबद्ध. पुंजीपतींचा पिक्चर त्यामुळं ‘होऊ दे खर्च, पण पिक्चर चालला पाहिजे‘, हे ठरलं होतं. पण चंद्रकांतदादा तसे काटकसरी. त्यामुळं खर्चाचं नियोजन त्यांनी स्वत:कडेच ठेवलं...

जाता-जाता : या दोन्हींसोबत वाघोबांनीही तथाकथित हॉरर फिल्म बनवली. पण ती झाली कार्टून फिल्म! गल्लीबोळातल्या चिल्ल्यापिल्ल्यांना बघण्यासाठी! संभाजीआप्पांच्या मुलांनीही ‘लो बजेट’ पिक्चर तयार केला. हातवाल्यांनी आणि घड्याळवाल्यांनी बंडकऱ्यांना समांतर पिक्चर काढायला लावला होताच. तोही तयार झाला... 

ताजा कलम : सगळ्यांचे पिक्चर रिलीज झाले. रटाळ सुरुवातीनंतर मध्यंतर कधी झालं कळलंच नाही. आता तर पिक्चर क्लायमॅक्सकडं चाललाय. पण कोण हिरो आणि कोण व्हिलन, हेच कळत नाही. पाहू या... पिक्चर तो अभी बाकी है!

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणElectionनिवडणूक