ब्रम्हनाळच्या संगमावर बहरणार चित्र, शिल्प, काव्यसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:09+5:302021-02-16T04:28:09+5:30

भिलवडी : ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे आनंदमूर्ती स्वामी संस्थान यांच्यावतीने शनिवार, दि. २० व रविवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी आनंदोत्सव ...

Picture, sculpture, poetry convention will flourish at the confluence of Brahmanal | ब्रम्हनाळच्या संगमावर बहरणार चित्र, शिल्प, काव्यसंमेलन

ब्रम्हनाळच्या संगमावर बहरणार चित्र, शिल्प, काव्यसंमेलन

भिलवडी : ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे आनंदमूर्ती स्वामी संस्थान यांच्यावतीने शनिवार, दि. २० व रविवार, दि.२१ फेब्रुवारी रोजी आनंदोत्सव या चित्र, शिल्प, काव्य, कलारजनीचे आयोजन केले आहे.

कृष्णा-येरळा नदीच्या संगमावर असणाऱ्या आनंदमूर्ती घाट परिसरात हे संमेलन होत आहे. या कार्यक्रमात शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी महाराष्ट्रातील चित्रकार आपली निसर्गचित्रे रेखाटणार आहेत. यामध्ये सुरेश पंडित, अन्वर हुसेन, बाळासाहेब पाटील, नागेश हंकारे, सत्यजित वरेकर, वैशाली पाटील यांच्यासह पंचवीसहून अधिक चित्रकार सहभागी होणार आहेत.

शनिवारी दुपारी तीन वाजता संपत कदम प्रस्तुत ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. रविवारी दुपारी तीन वाजता ‘आभाळमाया निसर्ग काव्य संमेलन’ होणार आहे. ज्येष्ठ कवी सुभाष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संमेलनात दयासागर बन्ने, अभिजित पाटील, मनीषा पाटील, गौतम कांबळे, नामदेव जाधव, वर्षा चौगुले, जास्मिन शेख, संदीप नाझरे, धनश्री खाडे आदी निमंत्रित कवी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला प्रसिद्ध शिल्पकार संजय तडसरकर उपस्थित राहणार आहेत. या आनंदोत्सवास चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे, आभाळमायाचे प्रमोद चौगुले उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन आनंदमूर्ती स्वामी संस्थान, ब्रम्हनाळ आणि संयोजक बाळासाहेब पाटील, सुरेश पंडित, विलास गोसावी यांनी केले आहे.

Web Title: Picture, sculpture, poetry convention will flourish at the confluence of Brahmanal