शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

निलंबित पोलिस चौकशीच्या फेºयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 11:58 PM

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत खून झाल्याची माहिती असूनही, ती वरिष्ठ अधिकाºयांपासून लपवून ठेवल्याप्रकरणी निलंबित सात पोलिसही चौकशीच्या फेºयात अडकले आहेत. सीआयडीकडून त्यांना चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. अनिकेत कोथळेने चाकूच्या धाकाने लुबाडलेल्या कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांची सीआयडीने आज दोन तास कसून चौकशी केली.कवलापूर (ता. ...

सांगली : अनिकेत कोथळे याचा पोलिस कोठडीत खून झाल्याची माहिती असूनही, ती वरिष्ठ अधिकाºयांपासून लपवून ठेवल्याप्रकरणी निलंबित सात पोलिसही चौकशीच्या फेºयात अडकले आहेत. सीआयडीकडून त्यांना चौकशीसाठी पाचारण केले जाणार आहे. अनिकेत कोथळेने चाकूच्या धाकाने लुबाडलेल्या कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांची सीआयडीने आज दोन तास कसून चौकशी केली.कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांना लुबाडल्याप्रकरणी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांना गेल्या सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. गुन्हे कबूल करण्यासाठी निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व ‘झिरो’ पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी ‘थर्डडिग्री’चा वापर करून अनिकेतला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण रात्री ड्युटीवर असलेल्या पोलिसांना माहीत होते. सर्वांसमोर कामटेच्या पथकाने अनिकेतचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या बेकर मोबाईल गाडीतून नेला होता. वास्तविक ठाणे अंमलदार, वायरलेस आॅपरेटर, कोठडीबाहेर गार्ड म्हणून ड्युटी करणाºया कर्मचाºयांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाºयांना द्यायला हवी होती; पण ते गप्प बसले. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी ठाणे अंमलदार मिलिंद शिंदे, पोलिस कोठडीचे गार्डप्रमुख प्रदीप जाधव, श्रीकांत बुलबुले, ज्योती वाजे, स्वरुपा पाटील, वायरलेस आॅपरेटर सुभद्रा साबळे व गजानन व्हावळ यांना निलंबित केले होते. हे सर्वजण सीआयडीच्या चौकशीच्या फेºयात अडकले आहेत.संतोष गायकवाड यांच्यापासून खºयाअर्थाने गुन्ह्यास सुरुवात झाली. त्यांना लुबाडल्याप्रकरणी अनिकेत व अमोल भंडारेस अटक झाली. त्यामुळे लुबाडणुकीची ही घटना कशी घडली? गायकवाड यांनी फिर्याद कधी दिली? अनिकेत व अमोलला शहर पोलिसांनी कधी अटक केली? त्यांना अटक केल्याची माहिती गायकवाड यांना दिली का? त्यांच्यासमोर आरोपींची ओळखपरेड केली का? त्यांना लंपास केलेला मोबाईल व दोन हजाराची रोकड जप्त केल्याची माहिती दिली का? या प्रश्नांच्या चौकशीसाठी सीआयडीने मंगळवारी गायकवाड यांना पाचारण केले होते. त्यांची दोन तास चौकशी करुन जबाब नोंदवून घेतला आहे.कारण स्पष्ट व्हावे : आशिष कोथळेपोलिसांनी अनिकेतला बेदम मारहाण करुन त्याचा खून का केला याचे कारण सीआयडीने स्पष्ट केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा मृत अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले, दोन हजाराच्या चोरीसाठी पोलिस त्याचा जीव घेतात, हे कारण पटत नाही. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचाही शोध लागला पाहिजे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. सीआयडीच्या तपासावर आमचे कुटुंब समाधानी आहे.उज्ज्वल निकम यांच्याकडून होकारअनिकेतच्या खूनप्रकरणी कोथळे कुटुंबियांनी ज्या लोकांवर संशय व्यक्त केला आहे, त्या दोन्ही व्यापाºयांसह फिर्यादीची पुन्हा चौकशी केली जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, कोथळे प्रकरणाचा न्यायालयीन लढा लढण्याबाबत उज्ज्वल निकम यांनी होकार दर्शविल्याचे केसरकर यांनी यावेळी सांगितले.केसरकर यांनी मंगळवारी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह कोथळे कुटुंबियांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोथळे कुटुंबियांच्या सर्व मागण्या मान्य करतानाच, त्यांच्या तक्रारींचीही दखल घेतली आहे. दोन व्यापारी आणि चोरीतील फिर्यादीबद्दल कोथळे कुटुंबियांची तक्रार होती. त्याचीही दखल घेण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू होईल. दरम्यान, या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची आग्रही मागणी होती. त्याप्रमाणे निकम यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी हे प्रकरण हाताळण्यास होकार दिला आहे. लवकरच याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्याबाबतही हालचाली सुरू आहेत. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न करतानाच पोलिस दलाचेही या प्रकरणामुळे खच्चीकरण होऊन बाहेरील गुन्हेगारांना बळ मिळू नये म्हणूनही दक्षता घेण्यात येईल. त्यासाठीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत.अनिकेत कोथळे व त्यांच्या कुटुंबियांची डीएनए चाचणी लवकर पूर्ण होऊन मृतदेह ताब्यात देण्यासाठी यंत्रणा काम करीत आहे.सुभाष देशमुख विरोधकांच्या टीकेनंतर सांगलीतकोथळे कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्टÑातील अनेक दिग्गज नेते, मंत्री भेटीस येत असताना, पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली नाही, अशी टीका राजकीय पातळीवर सुरू झाल्यानंतर अखेर पालकमंत्री सुभाष देशमुख मंगळवारी सांगलीत हजर झाले. कोथळे कुटुंंबियांची भेट घेऊन त्यांनी दिलासा दिला. भेटीस झालेल्या विलंबाबद्दल त्यांनी मौन बाळगले, तर केसरकरांनी देशमुखांच्या अन्य दौºयांचे कारण पुढे केले.विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आपच्या नेत्या प्रीती मेनन-शर्मा, ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हा सुधार समितीचे अ‍ॅड. अमित शिंदे व सर्वपक्षीय कृती समितीने पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षावर बोट ठेवले. त्यामुळे देशमुख मंगळवारी सांगलीत आले. पत्रकारांशी संवाद साधताना सांगलीत उशिरा भेट दिल्याबद्दल देशमुखांनी कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा