संजयनगरमध्ये बंद पेट्रोलपंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:21 IST2021-06-05T04:21:01+5:302021-06-05T04:21:01+5:30

संजयनगर : सांगलीच्या संजयनगरमध्ये प्रभाग क्रमांक ११ येथे शुक्रवारी बंद असलेल्या पेट्रोलपंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर येत असल्याने एकच खळबळ ...

Petrol out of closed petrol pump tank in Sanjaynagar | संजयनगरमध्ये बंद पेट्रोलपंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर

संजयनगरमध्ये बंद पेट्रोलपंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर

संजयनगर : सांगलीच्या संजयनगरमध्ये प्रभाग क्रमांक ११ येथे शुक्रवारी बंद असलेल्या पेट्रोलपंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर येत असल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती महापालिका मुकादम अमोल घनके यांनी अग्निशामन दलाला दिली. त्यानंतर मनपा अग्निशामक विभागाने तातडीने धाव घेऊन खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या.

संजयनगर येथे विरुपक्ष पेट्रोलपंप आहे. हा पंप गेल्या डिसेंबरपासून बंद आहे. शुक्रवारी सकाळी बाराच्या सुमाराला मुकादम अमोल घनके हे प्रभागाची पाहणी करताना त्यांना टाकीच्या व्हॉल्व्हमधून पेट्रोल बाहेर येत असल्याचे दिसले. यानंतर त्यांनी ही माहिती अग्निशामक दलाला दिली. मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे हे ताफ्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

संजयनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक काकासाहेब पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. यावेळी व्हॉल्व्ह आणि आजूबाजूची पाहणी करीत पेट्रोल वर कसे येत असावे, याबाबत तपासणी सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर इंडियन ऑइल डेपोच्या अधिकाऱ्यांनासुद्धा पाचारण करण्यात आले आहे.

Web Title: Petrol out of closed petrol pump tank in Sanjaynagar