महागाई किती रडविणार, चार महिन्यांत पेट्रोल, डिझेल २०, तर सिलिंडर १२५ रुपयांनी महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:30+5:302021-02-10T04:25:30+5:30

सांगली : इंधन दराशी जगण्याच्या चाकांची गती बांधली गेेल्याने, वाढणाऱ्या दरांनी आता सामान्य लोकांच्या जिवाची घालमेल सुरू झाली आहे. ...

Petrol, diesel prices go up by Rs 20, cylinders by Rs 125 in four months | महागाई किती रडविणार, चार महिन्यांत पेट्रोल, डिझेल २०, तर सिलिंडर १२५ रुपयांनी महागले

महागाई किती रडविणार, चार महिन्यांत पेट्रोल, डिझेल २०, तर सिलिंडर १२५ रुपयांनी महागले

सांगली : इंधन दराशी जगण्याच्या चाकांची गती बांधली गेेल्याने, वाढणाऱ्या दरांनी आता सामान्य लोकांच्या जिवाची घालमेल सुरू झाली आहे. पेट्रोल, डिझेलसह स्वयंपाकाचा गॅस महागल्याने उत्पन्नाच्या घटत्या आलेखासमोर महागाईचा आलेख आकाशाला भिडत आहे. ही महागाई आणखी किती रडविणार, असा प्रश्न आता सामान्य लोकांना पडला आहे.

गेल्या चार महिन्यात पेट्राेल, डिझेल व गॅसच्या दराने विक्रमी उड्डाण केले आहे. महागाईचे बोट धरून इंधनांनी सामान्यांच्या मनात चिंतेची आग पेटविली आहे. महागाईचा हा आगडोंब शांत होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे चित्र आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे प्रत्येक वस्तूच्या वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. भाजीपाल्यापासून बांधकाम साहित्यापर्यंत साऱ्याच वस्तूंचे दर वाढत आहेत.

एकीकडे वाहनांच्या इंधन दराने पेट घेतला असताना, गॅसच्या दरानेही मोठी उडी घेतली आहे. गेल्या चार महिन्यात गॅसच्या दरात तब्बल २१ टक्के म्हणजे १२५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यातच गॅसवरील अनुदान बंद झाल्याने झोपडपट्टीपासून ते आलिशान बंगल्यापर्यंतच्या सर्वांनाच बाजारभावाप्रमाणे सिलिंडर खरेदी करावा लागत आहे. उत्पन्नाच्या स्थिर व घटत्या स्त्रोतांपुढे वाढत जाणारे हे खर्चाचे इमले पेलणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होऊ लागले आहे. महागाईचा हा छळवाद थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. उलट ती आणखी अक्राळविक्राळ रूप धारण करण्याची चिन्हे आहेत.

असे वाढले दर...

पेट्रोल प्रति लिटर

१ नोव्हेंबर ८७.५९ रु.

१ डिसेंबर ८९

१ जानेवारी ९०.२६

१ फेब्रुवारी ९३.०५

डिझेल प्रतिलिटर

१ नोव्हेंबर ७५.६१ रु.

१ डिसेंबर ७७.८१

१ जानेवारी ७९.२५

१ फेब्रुवारी ८२.२५

गॅस प्रति सिलिंडर (१४.२ किलो)

१ नोव्हेंबर ५९७.५० रु.

१ डिसेंबर ५९७.५०

१ जानेवारी ६९७.५०

१ फेब्रुवारी ७२२.५०

कोट

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीमुळे, घर चालवायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. उत्पन्न तेवढेच आहे, त्यात वाढ होत नाही. दुसरीकडे महागाई वाढत आहे.

- ऋषिकेश मोने, सांगली

कोट

महागाई वाढत असल्याने आता केवळ काटकसर करण्यावर भर आहे. महागाई कमी झाली तर मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देता येईल. सध्याची महागाई भीतीदायक आहे.

- राहीन अत्तार, सांगली

कोट

जगण्याची आमची सध्या कसरत सुरू आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दराने हैराण झालो आहोत. उत्पन्न घटत असताना खर्च वाढत आहे.

- विशाल भंडारे, सांगली

Web Title: Petrol, diesel prices go up by Rs 20, cylinders by Rs 125 in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.