पेठ येथील युवकाचा अपघातामध्ये मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 17:19 IST2017-10-27T17:15:43+5:302017-10-27T17:19:42+5:30
इस्लामपूर—पेठ रस्त्यावरील कापूरवाडी हद्दीत झालेल्या अपघातातील जखमी पेठ येथील युवकाचे गुरुवार दि. २६ रोजी कऱ्हाड येथे उपचार सुरु असताना निधन झाले. माणिक आनंदराव माळी (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवार दि. १७ रोजी झाला होता.

पेठ येथील युवकाचा अपघातामध्ये मृत्यू
पेठ , दि. २७ : इस्लामपूर—पेठ रस्त्यावरील कापूरवाडी हद्दीत झालेल्या अपघातातील जखमी पेठ येथील युवकाचे गुरुवार दि. २६ रोजी कऱ्हाड येथे उपचार सुरु असताना निधन झाले. माणिक आनंदराव माळी (वय २३) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात मंगळवार दि. १७ रोजी झाला होता.
पेठ येथील युवक माणिक माळी काही कामानिमित्त दुचाकीवरुन इस्लामपूरला आला होता. तेथून पुन्हा तो पेठकडे जात असताना, कापूरवाडीनजीक त्याच्या दुचाकी (क्र. एमएच 0८ एस २११५) ला अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी घसरून रस्त्यावर आदळली.
या अपघातात माणिक माळी याच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघातानंतर तात्काळ त्याला कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरु असतानाच गुरुवारी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील आहेत.