corona virus Sangli : सांगलीतील शासकीय रुग्णालयात कायम स्वरुपी आँक्सिजनचा पुरवठा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 17:25 IST2021-05-24T17:02:02+5:302021-05-24T17:25:07+5:30

corona virus Sangli : सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील ३०० बेडला आता कायम स्वरुपी आँक्सिजनचा पुरवठा सुरु राहाणार आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता पोलीस बंदोबस्तात पुण्याहून पहिला १५ टन ऑक्सिजन टँकर पोलीस बंदोबस्तात सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्याची माहीती शासकीय रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली. या रुग्णालयात लवकरच म्युकरमायकोसिसवर उपचार सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. गुरव यांनी दिली आहे. 

Permanent supply of oxygen to Government Hospital, Sangli | corona virus Sangli : सांगलीतील शासकीय रुग्णालयात कायम स्वरुपी आँक्सिजनचा पुरवठा सुरु

पुण्यातून आलेल्या ऑक्सिजन टँकरमधील ऑक्सिजन सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील टाकीत सोडण्यात आला, त्यावेळी रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, डॉ. नंदकिशोर गायकवाड, डॉ. मनोज पवार, डॉ.अष्टेकर, पी.आर.पाटील, महेश होवाळ, मुनीर पठाण, प्रशांत मोहिते आदी उपस्थित  होते. (छाया : सुरेंद्र दुपटे)

ठळक मुद्देसांगलीतील शासकीय रुग्णालयात कायमस्वरुपी आँक्सिजनचा पुरवठा सुरु म्युकरमायकोसिसवर उपचार सुरु होणार, पुण्याहून १५ टन टँकर बंदोबस्तात दाखल

सुरेंद्र दुपटे 

संजयनगर/सांगली : सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील ३०० बेडला आता कायम स्वरुपी आँक्सिजनचा पुरवठा सुरु राहाणार आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता पोलीस बंदोबस्तात पुण्याहून पहिला १५ टन ऑक्सिजन टँकर पोलीस बंदोबस्तात सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्याची माहीती शासकीय रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली. या रुग्णालयात लवकरच म्युकरमायकोसिसवर उपचार सुरु करण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. गुरव यांनी दिली आहे. 

  सोमवारी सकाळी आठ वाजता पुण्यातुन टायन निफाँन, पिंपरी चिंचवड, एमआयडीसी चाकण याठिकाणाहून १५ टन द्रव रूपातील ऑक्सिजन टँकरद्वारे सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस बंदोबस्तात दाखल झाला.या ऑक्सिजनचा पुरवठा सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या तीनशे बेडला कायम स्वरुपी सुरु राहणार आहे.  पुण्याहुन आलेल्या हा ऑक्सिजन सिव्हिलमध्ये असलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये सोडण्यात येत होते. याची पाहणी शासकीय रुग्णालयाचे उप अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी केली.  

आता म्युकरमायकोसिसवर उपचार होणार 

सांगलीतील या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात आता म्युकरमायकोसिसवर उपचार सुरु होणार आहेत.तसेच ३०० बेडच्या या रुग्णालयाला सोमवारपासूनच ऑक्सिजनचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. गुरव यांनी दिली आहे. यावेळी डॉ. नंदकिशोर गायकवाड, डॉ. मनोज पवार,डॉ. अष्टेकर, पी.आर.पाटील, महेश होवाळ, मुनीर पठाण, प्रशांत मोहिते आदी उपस्थित  होते.

 

Web Title: Permanent supply of oxygen to Government Hospital, Sangli