शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री एक्स्प्रेससह सहा एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 17:40 IST

यापुढे फक्त १५० किमीपर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार

मिरज : भारतीय रेल्वेच्या नव्या धोरणानुसार प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्स्प्रेससह कोल्हापूर-मनगुरू, कोल्हापूर-बिदर, कोल्हापूर-सोलापूर, मिरज-हुबळी लिंक एक्स्प्रेस, मिरज-पंढरपूर सुपरफास्ट या एक्स्प्रेस कायमस्वरूपी रद्द झाल्या आहेत, तर कोल्हापूर-पुणे, मिरज-हुबळी, मिरज-परळी, मिरज-कॅसलरॉक या पाच पॅसेंजर एक्स्प्रेस होणार आहेत.रेल्वेच्या नवीन धोरणानुसार केवळ हंगामामध्ये फुल्लं व इतरवेळा तोट्यात धावणाऱ्या सर्व एक्स्प्रेस व पॅसेंजर रद्द करण्यात येत आहेत. याबाबत रेल्वेने अधिकृत घोषणा केली नसली तरी कोविड साथीमुळे मार्च २०२०पासून बंद केलेल्या या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू होणार नसल्याची माहिती मिळाली. यापुढे फक्त १५० किमीपर्यंतच पॅसेंजर रेल्वे धावणार आहे.यापुढे, १५० कि.मी.च्या पुढे धावणाऱ्या पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर होणार आहे. त्यानुसार कोल्हापूर-पुणे पॅसेंजर, मिरज-हुबळी पॅसेंजर, मिरज-परळी पॅसेंजर, मिरज-कॅसलरॉक पॅसेंजरचा एक्स्प्रेसमध्ये विस्तार होणार आहे.रेल्वेच्या नवीन धोरणाप्रमाणे एखाद्या मार्गावर गाडी १२ महिने फुल्ल धावत असेल तर त्या मार्गावर एक नवी हमसफर सुरू होईल. त्यानुसार पुढील काळात इंटरसिटी, हमसफर, वंदे भारत, दुरान्तो व संपर्कक्रांती यांसारख्या एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यावर भर असणार आहे.मिरज-सोलापूर एक्स्प्रेसचा विस्तार करून कोल्हापूर-गुलबर्गा एक्स्प्रेस, बेळगाव-पुणे इंटरसिटी, मिरज-मंगळुरू महालक्ष्मी एक्स्प्रेस, बंगळुरू- ह.निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस व्हाया मिरज, कुर्डुवाडी, वास्को-ह.निजामुद्दीन गोवा हमसफर एक्स्प्रेस, यशवंतपूर-ह.निजामुद्दीन हमसफर एक्स्प्रेस या सहा नवीन गाड्या सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.वंदे भारत सुरू करण्याची मागणीयापूर्वी सुरू करण्यात आलेली गोवा दिल्ली साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस बंद झाली असून, आता पुन्हा गोवा-दिल्ली हमसफर एक्स्प्रेस नियमित सुरू होणार आहे. या नवीन गाड्यांसोबत कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी रेल्वेप्रवासी सेनेचे किशोर भोरावत यांनी केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे