शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील मौनी लोकप्रतिनिधी, चुकीच्या नियोजनामुळे कृष्णाकाठी पाणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 11:53 IST

जिल्ह्यासाठी ३७.५० टीएमसी पाणी देण्याचे कोयनेला बंधनकारक

सांगली : जिल्ह्यातील मौनी लोकप्रतिनिधी, चुकीच्या नियोजनामुळे कृष्णा नदीकाठावर पावसाळा संपताच पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचे वास्तव समोर येत आहे. कोयना धरणातून जिल्ह्यासाठी ३७.५० टीएमसी पाणी देण्याचे बंधन आहे; पण सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या आडमुठे धोरणामुळे सांगली जिल्ह्याला पाणी देण्यात आडकाठी आणली जात आहे.ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नदीपात्रात अपेक्षित पाणीसाठा नाही. जिल्ह्यातील मध्यम व लघुप्रकल्पात केवळ ३७ टक्के पाणीसाठा आहे. हाच साठा गतवर्षी ८८ टक्के होता. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडून सांगलीला पाणी देण्यात अडचणी आणल्या जात असल्याचा आरोपही होत आहे; पण सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी काय करतात ? असाही सवाल आहे. सांगली जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठी ३७.५० टीएमसी पाणी देण्याचा करार झाला आहे. त्यानुसार हे पाणी देण्याचे बंधन कोयना धरण विभागाला आहे; पण त्यासाठी लोकप्रतिनिधीकडून जोर लावला जात नाही.

याबाबत पाटबंधारे विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता विजयकुमार दिवाण यांच्याशी संपर्क साधला. दिवाण म्हणाले की, कोयना धरण आणि सांगली पाटबंधारे विभागात करार होऊन ३७.५० टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर टेंभू, ताकारी योजनेसाठी जादा सहा टीएमसी पाणी देण्याचा करार आहे. त्यानुसार जिल्ह्याला ४४ टीएमसी पाणी धरणातून सोडलेच पाहिजे. सध्या कोयना धरणातील जिवंत पाणीसाठा ८३ टीएमसी आहे. त्यातील सांगली जिल्ह्याच्या वाट्याचे पाणी सोडले तरी ४० टीएमसी पाणी शिल्लक राहते.जर दर पंधरा दिवसांपैकी दहा दिवस २१०० क्युसेकप्रमाणे पाणी सोडावे. पाच दिवस उपसा बंदी लावावी असे नियोजन एक नोव्हेंबर ते १५ जूनपर्यंत करावे. सिंचन, बिगर सिंचन, औद्योगिक व पिण्यासाठी १८ टीएमसी, टेंभूसाठी २० टीएमसी आणि ताकारीसाठी ६ टीएमसी राखीव ठेवल्यास ४४ टीएमसी पाणी खर्च पडेल. चुकीच्या नियोजनामुळे कृष्णा काठावरील लोकांना दुष्काळ सामोरे जावे लागत आहे. आजपर्यंत कधीही असे घडले नव्हते.

दुष्काळातही नदीकाठी पाणीटंचाई नव्हती१९९५ व २००३ मध्ये जिल्ह्यात दुष्काळ पडला होता. तेव्हाही कृष्णा नदीकाठच्या लोकांना पाण्याची टंचाई जाणवली नव्हती. त्यावेळी कोयना धरणात ७८ टीएमसी पाणी होते. तरीहीसुद्धा पाणी कपातीचे संकट निर्माण झाले नव्हते. वीजनिर्मितीसाठी ३९ टीएमसी पाणी शिल्लक असते. हे पाणी शेती, पिण्याच्या पाण्यासाठी वापरावे. विजेसाठी २२६ कोटी रुपये लागतील. इतका भार शासनाने उचलावा. पुरावेळी ५५ हजार कोटी खर्च करण्यापेक्षा २२६ कोटींचा भार कित्येक पटीने कमीच आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीriverनदीKoyana Damकोयना धरण